आला आला कोरोना बर्गर आला; डॉक्टर, नर्सची पसंती

mexico city covid burger getting popular
mexico city covid burger getting popular

मेक्सिको सिटी : कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यवसाय वाढीसाठी जो शक्कल लढवतो, तोच खरा व्यवसायिक. या कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या काळातही अनेकजण आपला व्यवसाय वाचवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी धडपडत आहेत. कोलकत्यात कोरोनाव्हायरच्या प्रतिकृतीमधील संदेश मिठाई तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता मेक्सिकोतील एका रेस्टॉरंटने हिरव्या रंगातील बर्गर तयार केले आहे. 

‘हॉटडॉग जंकोज’ या नावाच्या रेस्टॉरंटचे मालक रेने साउसेडो (वय ३९) म्हणाले की, कोरोनाच्या साथीमुळे व्यवसाय बंद असल्याने नुकसान झाले आहे. आता रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर कोरोनाच्या संकल्पनेवर आधारित बर्गर बनविण्याची कल्पना सुचली आणि त्याला मागणीही चांगली आहे.

या बर्गरची किंमत ३०० रुपये आहे.  कोरोना बर्गरमध्ये बीफ, मोजरेला चीज, कांदा, पालक, टोमॅटो, बॉरबन सॉस आणि ॲव्हकोडोचा आदी सामग्री वापरली आहे. रेने म्हणाले, ‘‘असे बर्गर तयार करण्याची कल्पना रेस्टॉरंटमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या कोरोना योद्धांमुळे सुचली. कोरोनाव्हायरसवर आधारित केक तयार करणाऱ्या काही लोकांना मी भेटलो. कोरोनाच्या आकारातील पाव तयार करुन देण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी ते बनवून दिले. यानंतर सर्व साहित्याचा वापर तयार करुन कोरोनाबर्गर साकारले.’’ 


डॉक्टर आणि परिचारिकांकडून कोरोनाबर्गरला पसंती मिळत आहे. लोक याकडे गमंत म्हणून पाहत असून कौतुक करीत आहेत. कोरोनाचा प्रभाव जसाजसा कमी होईल, तस बर्गरला मागणी वाढेल वाढेल, अशी आशा आहे. 
रेने साउसेडो, ‘हॉटडॉग जंकोज’ रेस्टॉरंटचे मालक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com