लॉकडाउनमधून सुटका नाहीच; देशभरात मुदत वाढवली 

coronavirus india lockdown extension home ministry
coronavirus india lockdown extension home ministry

नवी दिल्ली : देशभरात लॉकडाउनची स्थिती काय असणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती. त्यावर केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला असून, लॉकडाउन 5च्या नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं याची घोषणा केली आहे.

आणखी वाचा - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, मतं जाणून घेतली होती. त्यात बहुतांशी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याला अनुकूलता दाखवली होती. त्यामुळं देशात लॉकडाउनची मुदत वाढणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या गाईडलाईन्स नुसार देशात लॉकडाउनची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलीय. तसेच येत्या 8 जूनपासून रेस्टॉरंट्स, मॉल्स खुले करण्याला ही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या शहरांमधील परिसरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 

भारतात सध्या 11 शहरांमध्ये कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा विचार केला तर, या तीन शहरांमध्ये पाचव्या लॉकडाउनचे नियम वेगळे असणार आहेत.  

काय आहे नवी नियमावली?

  • रात्री 9 ते पहाटे पाच पर्यंत असणार संचारबंदी 
  • 8 जूनपासून रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सुरू करण्यास अनुमती
  • कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील परिसरातील निर्बंध शिथिल 
  • शाळा सुरू करण्यासंदर्भात जूनमध्ये निर्णय घेण्यात येणार 
  • राज्य सरकार, पालक संघटना, शाळांशी चर्चा करूनच निर्णय घेणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com