डेनव्हरमधील हजारो नागरिकांचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Migration of thousands of citizens in Denver
डेनव्हरमधील हजारो नागरिकांचे स्थलांतर

डेनव्हरमधील हजारो नागरिकांचे स्थलांतर

डेनव्हर (अमेरिका) : कोलोरॅडो राज्यातील डेनव्हरच्या जंगलातील वणव्याची तीव्रता वाढली आहे. आगीच्या ज्वाळांमध्ये परिसरातील सुमारे ५८० घरे, हॉटेल आणि एक व्यापारी संकुल भस्मसात झाले आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

हेही वाचा: World No Tobacco Day: माझे नाव आनंद, खऱ्या अर्थाने घरी आनंद आला...

डेनव्हरच्या बाहेरील परिसरात गुरुवारी (ता.३०) सकाळी जंगलाला आग लागून सात जण जखमी झाले आहेत. बोल्डर काउंटीचे शरीफ (Legal officer) जो पॉल म्हणाले, की परिसरात १६९ किलोमीटर प्रती तीस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वणव्याची व्याप्ती वाढणार असल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. यामध्ये मृत्यू व जखमींची संख्याही वाढू शकेल. ही आग एवढी भीषण आहे की, ती तातडीने नियंत्रणात येणे अवघड आहे, असेही त्यांनी सांगितले. आगीच्या झळांमुळे बचाव मोहिमेसाठी या परिसरात तैनात केलेले तीन उपशेरीफ आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर पडावे लागले.

हेही वाचा: महिनाअखेर कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता

वणव्यामुळे लुईसव्हिले हे २१ हजार लोकसंख्येचे शहर रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. याआधी सुपिरियर शहर सोडण्याचा आदेश नागरिकांना देण्यात आला होता. तेथील लोकसंख्या १३ हजार आहे. हे शहर डेनव्हरच्या उत्तर- पश्‍चिमेकडे साधारणपणे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. कोलोरॅडोच्‍या जंगलात हा वणवा गुरुवारी (ता.३०) भडकला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Migration
loading image
go to top