
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी आपल्या तीन सहकारी क्रू मेंबरसह यशस्वी उड्डाण केले आहे. शुभांशूची चर्चा देशासह जगभरात होत आहे. त्यांच्या कुटुंबाने या मोहिमेबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान शुभांशूने अंतराळात जाण्यापूर्वी त्यांची पत्नी कामना शुक्लासाठी एक खास संदेश लिहिला. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत आणि सर्वांचे आभारही मानले आहेत.