
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात रविवारी दुपारी बैठक पार पडली. तिआनजिन इथं गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी एससीओ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर गेले आहेत. या बैठकीबाबत आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलीय.