Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Iran Political Crisis: इराणचे पहिले सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोजतबा खामेनी यांनी एक निवेदन जारी केले. मोजतबा यांच्या मते, इस्रायल आणि अमेरिका इराणी सरकार उलथवून टाकण्याचे काम करत आहेत.
Iran Political Crisis

Iran Political Crisis

ESakal

Updated on

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या नागरिकांना इशारा देणारे एक निवेदन जारी केले. गुरुवारी मोजतबा म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या शत्रू राष्ट्रांनी इराणच्या सामर्थ्यापुढे शरणागती पत्करली आहे. आता ते अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेमध्ये निराशा किंवा वैफल्य निर्माण करणारी कोणतीही कृती ही शत्रूला मदत करण्यासारखीच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com