
Mother's Day 2022: 'मदर्स डे'शी संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
Mother's Day 2022: आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आईच्या या उपकारांप्रती कृतज्ञता म्हणून 'मदर्स डे' साजरा केला जातो. मुलांच्या यशात आईचे अतुलनीय आणि निस्वार्थ योगदान असतं. या योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.
आई आणि तिच्या मुलामध्ये एक बंध असतो. हा बंध अमूल्य आहे कारण आईचे अतूट प्रेम, वचनबद्धता आणि ममता याच्याशी कशाचीही तुलना होत नाही. मुलाचा जन्म झाल्यापासून आई तिची मुले नेहमी सुरक्षित राहतील, याची काळजी घेते. जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी ती झटत असते. (Everything you need to know about special day)
हेही वाचा: Mother's Day: यंदा 'मदर्स डे' ला आईला द्या 5 गिफ्ट्स! किंमतही स्वस्त
तारीख-
जगभरातील अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा केला जातो. सर्व देश एकाच दिवशी तो साजरे करत नाहीत. मात्र अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. भारतात या वर्षी ८ मे रोजी मदर्स डे आहे.
ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व-
भारतीय संस्कृतीत आईला नेहमीच आदराचं स्थान देण्यात आलं आहे. मातृदिनाचा सन्मान करण्याची कल्पना मूळतः 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला मांडण्यात आली होती. काही रिपोर्टनुसार, मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये युनायटेड स्टेट्समधील अॅना जार्विस नावाच्या महिलेने तिच्या आईच्या सन्मानार्थ साजरा केला होता. पुढे अमेरिकेतील अनेक भागांत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी याला राष्ट्रीय सुट्टी दिली होती.
हेही वाचा: Mothers Day 2022: विराट ते धोनी...; तुमच्या आवडत्या खेळाडूंना कोणी घडवलं?
साजरा करण्याची पद्धत-
या दिवशी लोक त्यांची आई आनंदी आहे की नाही, ती जीवनाचा आनंद घेत आहे याची खात्री करण्याचा प्रयत्न करतात. तिला भेटवस्तू देतात. तिला बाहेर जेवायला घेऊन जाऊ शकतात किंवा घरी तिच्यासाठी जेवण तयार करू शकतात.
Web Title: Mothers Day 2022 Everything You Need To Know About Special Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..