पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना विशेष लवादाने सुनावलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निकाल लाहोर उच्च न्यायालयाने आज दिला.

लाहोर : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना विशेष लवादाने सुनावलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निकाल लाहोर उच्च न्यायालयाने आज दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा ठपका ठेवून डिसेंबरला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

भाजपची सत्ता असलेल्या या राज्यात तान्हाजी टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

विशेष न्यायलयाने दिलेले इतर आदेशही लाहोर न्यायालयाने रद्द केले आहेत. विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षाच बेकायदा ठरवण्यात आल्याने ती रद्द झाली आहे, असे अतिरिक्त ऍटर्नी जनलर इश्‍कियात ए खान यांनी म्हटले आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

न्यायाधीश मुजाहीर अली नक्वी यांच्या नेतृत्त्वात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुशर्रफ यांच्यासंबंधीचा निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्वग्रहदूषित आहे, असेही लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Musharraf: Death penalty for ex-Pakistan president thrown out