esakal | जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!
sakal

बोलून बातमी शोधा

muslim

जपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे.

जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

टोकीयो- जपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे. तसेच जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा आहे. धर्मांतराची समस्या केवळ भारतात नाही, तर जपानही या समस्येशी झगडत आहे. जपानची लोकसंख्या जवळजवळ 13 कोटी आहे. गेल्या एक दशकात म्हणजे 10 वर्षांमध्ये मुस्लीमांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. वेबसाईट economist.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 2010 मध्ये देशात मुस्लिमांची संख्या 1 लाख 10 हजार होती, 2020 मध्ये ती 2 लाख 30 हजार झाली आहे.

Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती...

जपानमध्ये धर्मांतराची समस्या

जपानमध्ये मुस्लीम समजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे सरकार आणि प्रशासन हैराण आहे. जपानच्या एकूण मुस्लीम लोकसंख्येचा विचार करता, यातील 50 हजार लोक जपानी आहेत, ज्यांनी धर्मांतर केलं आहे. ही अकडेवारी जपानच्या वसेडा यूनिवर्सिटीचे प्रोफेसर तनाडा हिरोफुमी यांनी जारी केली आहे. 

जपानसाठी धोका

जपानची घटती लोकसंख्या आणि जन्मदर कमी होत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान विदेशी वर्कर्सवर फोकस करत आहे. जपानचे मुळ निवासी या बदलामुळे चिंतीत आहेत.

भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र

जपानच्या मुस्लीमांची मागणी

जपानमधील मुस्लीमांची संख्या वाढल्याने त्यांच्यासाठी सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत. आता मुस्लीम लोकसंख्या अन्य वस्तूंची मागणी करु लागले आहेत. सरकारी डाटानुसार, जपानमध्ये मशिदींची संख्या 110 पेक्षा अधिक झाली आहे. एकीकडे मुस्लींमांची संख्या वाढत आहे, पण मुस्लीमांना काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. कब्रिस्तानसाठी जागा शोधणे मुस्लीमांसाठी आवाहन बनले आहे. जपानमध्ये मृतदेहाला जाळण्याची पंरपरा आहे. आधी कब्रिस्तान होते, पण आता मुस्लीमांची संख्या वाढल्याने जागेसाठी अडचणी येत आहेत. 

loading image
go to top