

Rescue teams search through debris after a massive explosion in Myanmar’s Namkham township that killed over 55 people and destroyed more than 100 homes.
esakal
म्यानमारमध्ये एका प्रचंड स्फोटात किमान ५५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी चीनच्या सीमेजवळ असलेल्या नामखाम टाउनशिपमधील 'काउंग तात' गावात घडली. 'ता'आंग नॅशनल लिबरेशन आर्मी' (TNLA) या बंडखोर गटाने असा दावा केला आहे की, खाणकामासाठी कथितरित्या साठवून ठेवलेल्या स्फोटक साहित्याच्या निष्काळजी हाताळणीमुळे हा स्फोट झाला.