पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earth

पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण...

भारतात यंदाचा उन्हाळा तीव्र आहे. मागील १०० वर्षातील सर्वात उष्ण उन्हाळा ठरलाय. उष्णतेच्या लाटांनी नागरिक हैराण झालेत. उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा भारतीयांसाठी सोपा नाहीच. यावर आता 'नासा ' या अंतराळ संशोधन संस्थेनेही शिक्कामोर्तब केलीय. नासाच्या वर्षभराच्या सॅटेलाईट डाटामध्ये पृथ्वीचं तापमान अभूतपूर्वरित्या वाढल्याचं समोर आलंय. (NASA's data shows Earth heating Up)

पृथ्वीवर सूर्य आग ओकतोय अशीच स्थिती सध्या असल्याचं समोर येतंय. मार्च २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंतचा डाटा तपासण्यात आलाय. पृथ्वीवर सूर्याकडुन येणारी उष्णता मोठ्या प्रमाणात शोषली जातेय. मात्र सूर्यकिरणांच्या परावर्तनाचं प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. यामुळे पृथ्वीचं वातावरण प्रचंड तापलंय, तसंच जमीन, समुद्राचं तापमान देखील बरच वाढलंय. मोठ्या प्रमाणात बर्फ वितळून समुद्राची पाणी पातळी वाढतेय.

नासाच्या डाटामध्ये पृथ्वीच्या प्रति चौरसमीटरमध्ये 1.64 वॅट उर्जा आहे. याचाच अर्थ पृथ्वीवर अतिरिक्त उर्जा निर्माण झालेली आहे. मागील वीस वर्षात ग्लोबल वॉर्मिंग तिपटीने वाढलंय. नासाच्या डेटानुसार १० लाख हिरोशिमाचे अणूबॉम्ब टाकल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेइतकी उष्णता पृथ्वीच्या वातावरणात आहे. हा मानवजातील धोक्याचा इशारा आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, दगडी कोळसा, तसंच पेट्रोल -डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचं वातावरण अधिक तापत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.

Web Title: Nasas Data Shows Earths Temperature Increased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EarthGlobal WarmingNASA
go to top