...म्हणून आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो, घ्या जाणून

national moon day 2022 know about its history NASA Neil Armstrong
national moon day 2022 know about its history NASA Neil Armstrongesakal

मानवाने 1969 मध्ये चंद्रावर पहिले पाऊल टाकले तो दिवस म्हणून चंद्र दिवस साजरा केला जातो. २० जुलै १९६९ या दिवशी अमेरिकेचे सुप्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते.(national moon day 2022 know about its history NASA Neil Armstrong)

national moon day 2022 know about its history NASA Neil Armstrong
Twitter Deal : मस्क यांना न्यायालयाचे आदेश, ऑक्टोबरपासून सुनावणीला सुरुवात

चंद्र दिवस का साजरा केला जातो?

हा तो दिवस होता जेव्हा 20 जुलै 1969 रोजी रात्री 20:17 वाजता अपोलो 11 पृथ्वीच्या एकमेव उपग्रहावर उतरला. लँडिंगच्या सहा तासांनंतर अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने 21 जुलै रोजी पहाटे 2:56 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले. आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तेव्हा तो क्षण थेट प्रक्षेपित करण्यात आला.

बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. यानाच्या बाहेर सुमारे अडीच तास घालवले. त्यांनी पृथ्वीवर परत आणण्यासाठी 21.5 किलो चंद्राची सामग्री गोळा केली. ट्रँक्विलिटी बेस नावाच्या साइटवर सुमारे 21 तास घालवले होते. त्यानंतर हे तिघे पृथ्वीवर परत आले आणि आठ दिवसांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर २४ जुलै रोजी पॅसिफिक महासागरात उतरले.

national moon day 2022 know about its history NASA Neil Armstrong
युरोप, आफ्रिकी, आशियायी देशांची होरपळ

चंद्र दिवसाचे महत्त्व

हा दिवस नासाच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. 20 जुलै रोजी, अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि त्याचा साथीदार बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले आणि सुमारे 47.5 पौंड चंद्र सामग्री गोळा केली. जी त्यांनी अभ्यासासाठी पृथ्वीवर परत आणली.

हा दिवस केवळ ऐतिहासिक मोहिमेचा उत्सव साजरा करत नाही तर शास्त्रज्ञांना आशा देतो की मानव आता अंतराळात जाऊ शकतो. नील आर्मस्ट्राँगच्या "वन स्मॉल स्टेप फॉर मॅन" या भाषणाने कल्पकतेला चालना दिली आणि नाविन्य निर्माण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com