esakal | 'जनरल जियांचे बूट पॉलिश करुन नवाझ शरीफ यांचा राजकारणात प्रवेश'
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan nawaz sharif.jpg

तीनवेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले 70 वर्षीय नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये न्यायालयाने सत्तेतून बेदखल केले होते.

'जनरल जियांचे बूट पॉलिश करुन नवाझ शरीफ यांचा राजकारणात प्रवेश'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कराची- पाकिस्तानमधील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यात तर शाब्दिक युद्ध रंगले आहे. नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर निवडणुकीत अफरातफरीचा आरोप करताना इम्रान खान यांचे सरकार रिमोटवर असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला आता इम्रान खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाझ शरीफ हे 1980 मध्ये मार्शल लॉ दरम्यान जनरल जिया उल हक यांचे बूट पॉलिश करुन राजकारणात आले होते, अशा शब्दांत इम्रान खान यांनी शरीफ यांचा समाचार घेतला आहे. जे सैनिक देशासाठी आपले प्राण पणाला लावतात. अशा सैन्यदलाविरोधात शरीफ बोलत आहेत, असेही इम्रान खान म्हणाले. 

तीनवेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले 70 वर्षीय नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये न्यायालयाने सत्तेतून बेदखल केले होते. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच थेट लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट फैज हमीद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे.

हेही वाचा- चिदंबरम यांचे आयएसआय-नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, भाजप नेत्याचा आरोप

नवाझ शरीफ हे लाहोरपासून सुमारे 80 किमी दूर गुजरानवाला येथे 11 विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटला (पीडीएम) संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी लष्करप्रमुख आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. ते लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सभेत सहभागी झाले होते. 

ते म्हणाले की, जनरल कमर जावेद बाजवा यांनी माझे सरकार संपुष्टात आणले. 2018 मध्ये निवडणुकीत अफरातफरी करुन इम्रान खान यांचे अपयशी सरकार जनतेच्या माथी मारले. जनरल बाजवा हेच गुन्हेगार आहेत. त्यांनीच याचे उत्तर द्यावे.

हेही वाचा- चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

आपले सरकार पाडण्यामागे आयएसआयचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा सगळा प्रकार आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीदच्या मदतीने झाल्याचेही त्यांनी म्हटले. 

विरोधी पक्षांनी 20 सप्टेंबर रोजी पीडीएमची स्थापना करणे आणि तीन टप्प्यात सरकारविरोधी अभियान सुरु करण्याची घोषणा केली होती. त्या अंतर्गत इम्रान खान सरकार हटवण्यासाठी देशभरात सभा, आंदोलन आणि रॅली सुरु करण्यात आल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये इस्लामाबादमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.