भारतात कोरोनाचा हाहाकार! आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर; स्पेनला मागे टाकले, इंग्लडलाही मागे सोडणार 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 7 June 2020

शनिवारी एकाच दिवशी देशात 9,971 नवे कोरोना रुग्ण सापडले.  एकाच दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. देशात कोरोना रुग्णांती संख्या आता 2,46,638 एवढी झाली आहे. भारताने स्पेनला मागे टाकून सर्वाधिक कोरोना बाधितांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

मुंबई ; लॉकडाऊन शिथील होत असतांना, देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शनिवारी एकाच दिवशी देशात 9,971 नवे कोरोना रुग्ण सापडले.  एकाच दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. देशात कोरोना रुग्णांती संख्या आता 2,46,638 एवढी झाली आहे. भारताने स्पेनला मागे टाकून सर्वाधिक कोरोना बाधितांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा...

गेल्या तिन दिवसापासून देशात दिवसाला सरासरी 10 हजार पर्यंत नवे रुग्ण सापडत आहेत. यामध्ये एकट्या महाराष्ट्रातचं 2739 एवढे रुग्ण सापडले आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरची ही वाढ चिंताजनक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.या आकडेवारीमुळे जगात सर्वात जास्त बाधित देशामध्ये पाचव्या क्रमाकांवर पोहोचला आहे. भारत  काही दिवसातचं   ग्रेट ब्रिटेनला मागे टाकून  या यादीत चवथ्या क्रमांकावर जाणार, असं चित्र आहे. ग्रेट ब्रिटेनमध्ये गेल्या काही दिवसापासून नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. 

खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष... 

कोरोना बळींची संख्या 4 लाखावर
जगभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या चार लाखाच्या जवळ पोहोचली आहे. शनिवारपर्यंत ही संख्या 3,99,494 एवढी होती. यामध्ये एकट्या अमेरिकेत 1 लाख 10 हजार मृत्यु झालेत. त्या खालोखाल  ग्रेट ब्रिटेनमध्ये 40,465 तर ब्राझीलमध्ये 35,930 रुग्ण आतापर्यत कोरोनामुळे दगावले आहेत. मात्र या देशांच्या तुललेत भारतात मृत्युंचे प्रमाण कमी आहे.

मुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'!
.
या देशात फोफावतोय कोरोना 
ब्राझील ,भारत, पेरु ,इराण, फ्रांस ,चिली, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रीका
....
या देशात  कोरोना स्थिरावलाय
अमेरिका, रशिया, सौदी अरेबीया, चीन, कतार, बेलारुस, जपान, इंडोनेशीया, पोलंड 
....
या देशात रुग्णसंख्येत घट
ग्रेट ब्रिटेन, इटली, स्पेन, जर्मनी,तुर्की, मेक्सिको, कॅनडा,बेल्जीयम, नेदरलँड,कुवेत, युएई
...

जगातिल टॉप 6 कोरोना बाधित देश

1.अमेरिका
कोरोना बाधितांची संख्या-  19,33,738
मृत्यु- 1,10,023 

2. ब्राझील 
कोरोना बाधितांची संख्या -  6,72,846 
मृत्यु-  35,930 

3. रशिया 
कोरोना बाधितांची संख्या - 4,58,102
मृत्यु- 5,717

4. ग्रेट ब्रिटेन
कोरोना बाधितांची संख्या - 2,84868
मृत्यु – 40,465

5. भारत 
कोरोना बाधितांची संख्या - 2,46,628 
मृत्यु- 6,929

6. स्पेन 
कोरोना बाधितांची संख्या - 2,41,310  
मृत्यु- 27,135


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ndia ranked fifth in the international corona rankings; Spain will be left behind, England will be left behind