‘ड्युरँड रेषेवर शांतता गरजेची’

पीटीआय
Sunday, 22 November 2020

ड्युरँड रेषेवर होणारी दहशतवाद्यांची ये-जा थांबत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता  नांदणार नाही, असे परखड मत भारताने आज संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची सीमरेषा ड्युरँड रेषा म्हणून ओळखली जाते.

न्यूयॉर्क - ड्युरँड रेषेवर होणारी दहशतवाद्यांची ये-जा थांबत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता  नांदणार नाही, असे परखड मत भारताने आज संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची सीमरेषा ड्युरँड रेषा म्हणून ओळखली जाते.

पाकिस्तानमधून दहशतवादी अफगाणिस्तानात घुसखोरी करत अशांतता निर्माण करत असल्याचा भारतासह अफगाणिस्तानचाही दावा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील विशेष सत्रात बोलताना भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, शांतता आणि संघर्ष हे एकाच वेळी असू शकत नाही. अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळासाठी शांतता निर्माण होण्यासाठी आपल्याला दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना संरक्षण देणे बंद करावे लागेल आणि ड्युरँड रेषेपलिकडील त्यांची ठिकाणे नष्ट करावी लागतील. शांततेसाठी या रेषेवरून होणारा दहशतवाद्यांचा पुरवठा बंद पाडायला हवा. सुरक्षा परिषदेने एकमताने या संघर्षाविरोधात कारवाई करणे आवश्‍यक आहे. तिरुमूर्ती यांच्या बोलण्याचा सर्व रोख पाकिस्तानकडे होता. 

ट्विटर बायडेन यांच्याकडे देणार अध्यक्षीय अकाऊंटचे अधिकार

अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा आहे. ही शांतता प्रकिया अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या हितासाठी होणे आवश्‍यक आहे. येथील समस्येवरील उपाय स्थानिकांकडूनच सुचविले जाणेही आवश्‍यक आहे. 
- टी. एस. तिरुमूर्ती, ‘यूएन’मधील भारताचे प्रतिनिधी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need peace on the Durand Line