चायनीज खाणं पडलं महागात; विद्यार्थ्याच्या अंगाचा बदलला रंग

Chinese Food
Chinese Foodesakal
Summary

कोरोना व्हायरसमुळं जगभरात चीनकडं संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय.

कोरोना व्हायरसमुळं (Coronavirus) जगभरात चीनकडं (China) संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय. अशातच आता चायनीज खाद्यपदार्थाबाबत (Chinese Food) एक प्रकरण समोर आलंय. या चायनीज पदार्थामुळं एका विद्यार्थ्याचे दोन्ही पाय आणि बोटं कापावी लागली आहेत. 19 वर्षीय विद्यार्थ्यानं रेस्टॉरंटमधून उरलेलं चायनीज पदार्थ खाल्ल्यानंतर, काही वेळातच त्याचे दोन्ही पाय आणि बोटं कापावी लागली.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (New England Journal of Medicine) जेसी नावाच्या विद्यार्थ्यानं रेस्टॉरंटमधून जेवण आणल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते खाल्लं. त्यामुळं जेवणात सेप्सिस आणि गॅंग्रीनचं (बॅक्टेरिया) प्रमाण वाढलं होतं. अहवालानुसार, विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्यानं त्याला बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या (Massachusetts General Hospital) बालरोग अतिदक्षता विभागात (PICU) दाखल करण्यात आलं होतं. पहिले 20 तास रुग्ण बरा होता; पण नंतर त्याला पोटात दुखू लागलं. त्याच्या अंगाचा रंग बदलू लागला आणि तो रंग त्याच्या अंगभर पसरू लागला.

Chinese Food
पुतीन चुकीचं पाऊल उचलून युद्धाला आमंत्रण देतायत - जो बायडेन

न्यूयॉर्क पोस्टनुसार, हा विद्यार्थी रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. चायनीज दुकानातून उरलेलं अन्न खाल्ल्यानंतर त्याला थंडी वाजून येणं, धाप लागणं, डोकेदुखी, डोळ्यांना आंधारी आणि छातीत दुखू लागलं. रुग्णाच्या एका मित्रानं सांगितलं की, त्याची त्वचा 'जांभळी' होऊ लागली असून सेप्सिसचा संसर्ग त्याच्या शरीरात पसरलाय. दरम्यान, रक्त आणि लघवीच्या चाचण्यांवरून असं दिसून आलं की, रुग्णाला निसेरिया मेनिन्जाइटिस (Neisseria Meningitidis Symptoms) नावाच्या बॅक्टेरियाच्या संसर्गानं ग्रासलं होतं. या 19 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याची सर्व बोटं आणि दोन्ही पाय कापावी लागली आहेत. उपचारादरम्यान विद्यार्थी तब्बल 26 दिवस बेशुद्ध पडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com