नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट

कार्तिक पुजारी
Saturday, 18 July 2020

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले असताना नेपाळही भारतासोबत आक्रमक होताना दिसत आहे.

काटमांडू- गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले असताना नेपाळही भारतासोबत आक्रमक होताना दिसत आहे. नेपाळने भारताच्या रस्ते आणि धरणे बांधण्यावर आक्षेप घेतला आहे. यामुळे पूराची समस्या निर्माण होत असल्याचं नेपाळनं म्हटलं आहे. खरं म्हणजे नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे बिहार आणि अन्य इतर भाग पाण्याखाली जात असतात. गंडक आणि कोसी नदीच्या पाण्याने अनेकदा बिहारमध्ये पूर येतो.

पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येच्या आरोपीसोबत दिसले भाजप नेते 
नेपाळचे वृत्तमानपत्र क्रांतिपुरनुसार, पंतप्रधान के.पी. ओली सरकारने भारताला राजनैतिक पत्र लिहून रस्ता आणि धरणाच्या निर्माण कार्यावर आपत्ती दर्शवली आहे. वृत्तपत्रात सिंचन मंत्र्याचे सचिव रवींद्र नाथ श्रेष्ठ यांच्या वतीने लिहण्यात आलं आहे की, नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी भारत सरकारला कायदेशीर एक पत्र लिहिलं आहे. तसेच दरवर्षी दोन्ही देशांमध्ये होणारी पूर आणि पाणी  व्यवस्थापनाची संयुक्त समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करावी यासाठी आग्रह धरण्यात आला आहे.

राजनैतिक पत्र दोन्ही देशांमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यावरुन दिल जात आलं आहे. यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट नाही. दोन्ही देश कोणत्याही मुद्द्यावर आपसातील चर्चेतून मार्ग काढू शकतात, असं नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता भरतराज पौड्याल म्हणाले आहेत.

मोठी बातमी! आता भारताचं तेल साठवलं जाणार अमेरिकेत
नेपाळचे गृहमंत्री राम बहादूर थापा यांनी संसदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतावर आरोप केला आहे. भारताच्या हस्तक्षेपामुळे देशाच्या दक्षिण भागात नैसर्गिक आपत्ती येत आहे, असं ते म्हणाले आहेत. भारताने सीमेला लागून अनेक बांधकाम कार्य हाती घेतलं आहे. यामुळे नेपाळला मान्सूनच्या काळात संकटाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता आणि अन्य एकतर्फी बांधकामामुळे धरणाद्वारे नदीच्या पाण्याला अडवणे कठीण झालं आहे. त्यामुळे नेपाळच्या दक्षिण भागात पूर येत आहे, असंही ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, भारत आणि नेपाळमध्ये काही दिवसांपासून संबंध बिघडत आहेत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी वारंवार भारताविरोधात भूमिका घेत चीनला जवळ केलं आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या संसदेने भारताचा काही भूभाग आपला असल्याचं म्हणत नव्या नकाशात दाखवला आहे. यात लिपूलेख, कालापाणी आणि लिपियाधूरा या भागांचा समावेश होतो. भारताने नेपाळच्या या कृतीवर आक्षेप घेतल्याने संबंध बिघडले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepal again blame india for border activity