Nepal Aircraft Crash Update : यति एअर लाईन्सच्या भीषण अपघाताचं कारण आलं समोर

या भीषण अपघातात पाच भारतीयांचादेखील मृत्यू झाला होता.
Nepal Aircraft Crash
Nepal Aircraft Crash Sakal

Nepal Aircraft Crash Update : नेपाळमध्ये १५ जानेवारी रोजी यति एअर लाईन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला होता.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

यामध्ये क्रू मेंबर्ससह ७२ जणांचा दुर्दैंवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडण्यात यश आले होते. या अपघातीच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती.

त्यानंतर आता चौकशी समितीने या अपघाताच्या कारणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यति एअरलाइन्सच्या एटीआर-72 विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरनुसार हा या अपघाताचं मुळ कारण इंजिनमधील समस्या असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे.

Nepal Aircraft Crash
PHOTOS : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठं पाऊल! INS विक्रांतवर 'तेजस' चं यशस्वी लँडिंग

नेपाळच्या लोककलावंताचा अंत

पोखरा येथे झालेल्या या भीषण अपघातात नेपाळच्या लोककलावंत असलेल्या नीरा चंत्याल यांचादेखील मृत्यू झाला होता. चंत्याल या चंत्याल यूथ एसोसिएशनतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्याआधी घडलेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com