Nepal flood infrastructure damage
esakal
काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या आपत्तीमुळे सुमारे २०० अब्ज नेपाळी रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. मात्र, बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू असून नुकसानीचे सर्वंकष मूल्यांकन बाकी असल्याने या आकड्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला (Nepal flood damage reconstruction cost) नाही.