नेपाळमध्ये हाहाकार; महापुरात 77 ठार, तर डझनभर बेपत्ता

Nepal
Nepalesakal
Summary

नेपाळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून पूर आला आहे.

नेपाळ : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून महापुरासारखी स्थिती निर्माण झालीय. तसेच भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. नेपाळात आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू झाला असून 34 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल कुमार तमांग म्हणाले, भारताच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व नेपाळच्या पांचथर जिल्ह्यात 24, इलाममध्ये 13 आणि पश्चिम नेपाळमधील डोटीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंत्रालयानं सांगितलं, की या महापूर व भूस्खलनात 22 लोक जखमी झाले आहेत, तर 26 जण बेपत्ता आहेत. पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी, पूर आणि भूस्खलनातील मृतांच्या कुटुंबीयांना नुकतीच मदत जाहीर केलीय. सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 1,700 डॉलर म्हणजेच, 1,27266 रुपयांची मदत देईल, तर जखमींना मोफत उपचार देण्यात येणार आहेत. राजधानी काठमांडूच्या पश्चिमेला मुसळधार पाऊस सुरु असून या भागातील 60 लोक दोन दिवस झाले पुरात अडकून आहेत.

Nepal
पठ्ठ्याचा नादच खुळा! पिकवला 1 हजार किलोचा एकच भोपळा

पोलिस प्रवक्ते बसंत कुंवर म्हणाले, खराब हवामान आणि संततधार पावसामुळे बचाव पथक गावात पोहोचू शकले नाहीत. मात्र, सध्या बचावकार्य आजही सुरू आहे. नेपाळात भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून येथील नद्यांना पूर आलाय. तर या पावसात पूल, रस्ते, घरे आणि शहरातील विमानतळं पाण्याखाली गेली आहेत. देशाच्या विविध भागांत नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये अडकलेल्या लोकांना नेपाळ आर्मी, नेपाळ पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं शोधून बाहेर काढले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com