
China’s first official reaction to Nepal’s political instability highlights growing regional concerns.
esakal
China First Reaction on Nepal crisis : नेपाळमध्ये सद्य स्थितीस निर्माण झालेली अराजकता आणि सत्तापालटावर अखेर चीनने आपलं मौन सोडलं आहे. नेपाळमधील परिस्थितीवर चीनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बुधवारी चीनने नेपाळमधील सर्व पक्षांना स्थानिक मुद्दे योग्य पद्धतीने सोडवणे, सामाजिक व्यवस्था आणि स्थिरता बहाल करण्याचा आग्रह केला आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये नेपाळमधील परिस्थितीवर पहिल्यांदाच टिप्पणी केली आणि म्हटले, ‘’चीन आणि नेपाळ यांच्यात पारंपारिकरित्या मैत्रीपूर्ण शेजारधर्माचे नाते राहिले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, नेपाळमधील सर्व वर्ग स्थानिक मुद्द्यांना योग्यप्रकारे हाताळतील, सामाजिक व्यवस्था आणि क्षेत्रीय स्थिरता लवकरात लवकर बहाल करतील.’’
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेल्या झेन-झी आंदोलनाने उग्र रूप धारण केले, परिणामी नेपाळमध्ये सर्वत्र हिंसाचार पसरला आणि मोठी राजकीय उलथापालथ होत, ओली सरकारही कोसळलं. चीनने नेपाळमधील परिस्थितीवर सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे, तर चीनच्या पराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. खरंतर ओली हे चीनचे समर्थक नेते म्हणून मानले जातात. त्यांनी चीनसोबत नेपाळचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
विशेष म्हणजे ओली अशातच शांघाय येथील एससीओ परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला गेले होते. या दरम्यान त्यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानवरील विजयाच्या स्मरणार्थ ३ सप्टेंबर रोजी आयोजित चीनी सैन्य परेडमध्येही सहभाग घेतला होता.
ओली चीनवरून परतल्यानंतर काही दिवसांतच नेपाळमध्ये तरूणांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला वैतागून विरोध प्रदर्शन सुरू केले. त्यात २६ सोशल मीडिया अप्सवर सरकारने बंदी घातल्यानंतर तो असंतोष अधिकच उफाळला आणि मग तीव्र आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे नेपाळमधील ओली यांचे सरकार कोसळले, आंदोलकांनी नेपाळची संसदही पेटवली, राष्ट्रपतींनाही राजीनामा द्यावा लागला आणि संपूर्ण नेपाळमध्ये अराजकता पसरली.
नेपाळमधील चीनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत लिन यांनी म्हटले की, आतापर्यंत तरी कुणाच्याही जीवाला धोका निर्माण झालेला नाही. तरी त्यांनी हेही सांगितले की, चीनने नेपाळमधील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. नेपाळमधील चीनी दूतावासाने एक इमर्जन्सी सिक्योरिटी सिस्टम सुरू केली आहे आणि चीनी नागिरकांना सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.