काठमांडू : नेपाळमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर केपी शर्मा ओली यांचे सरकार कोसळले आहे. Gen-Z चळवळीच्या पुढाकारामुळे हा बदल घडून आला असून, आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेची हालचाल सुरू झाली आहे. .आज (गुरुवार) लष्करप्रमुखांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अंतरिम सरकारवर एकमत होण्याची शक्यता आहे. या सरकारसाठी सुशीला कार्की (Sushila Karki Nepal) यांचे नाव सर्वात पुढे आहे. माजी मुख्य न्यायाधीश असलेल्या कार्की यांच्या नेतृत्वाखाली भारत-नेपाळ संबंधांची दिशा काय असेल, याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे..भारताशी कार्की यांचा दृष्टीकोनसुशीला कार्की भारताशी संबंधित (Nepal India Relations) आणि संलग्न मानल्या जातात. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्कृष्ट नेता मानतात. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यावेळी त्यांची ओळख त्यांचे पती दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाली, जे त्या काळचे लोकप्रिय युवा नेते होते..Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा.एका मुलाखतीत कार्की यांनी स्पष्टपणे सांगितले, की नेपाळचे भारताशी संबंध केवळ ऐतिहासिकच नाहीत, तर सुरक्षेच्या दृष्टीने आणि सांस्कृतिक नात्यांमुळेही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा आहे..भारताशी संबंध ताणले होतेमाजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात नेपाळचे चीनकडे अधिक झुकाव होते. त्यामुळे भारताशी संबंध ताणले गेले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताला फारसे प्राधान्य दिले नाही. मात्र, कार्की यांच्या नेतृत्वाखाली भारताशी नव्याने विश्वासार्ह संबंध प्रस्थापित होतील, असे मानले जाते..तज्ज्ञांचं काय आहे मत?भारताचे माजी राजदूत रणजित रे यांनी सांगितले की, नेपाळची सध्याची परिस्थिती नाजूक आहे. तरीही भारताला स्थिर नेपाळ हवे आहे आणि नेपाळी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नेतृत्वासोबत भारत सहकार्य करेल. बांगलादेशात युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. परंतु, नेपाळात कार्की यांच्या नेतृत्वामुळे संकटाच्या काळात संबंध मजबूत होण्याची शक्यता आहे..सुशीला कार्की कोण आहेत?सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत. त्यांचे शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक अनुभव त्यांना एक प्रभावी नेतृत्वासाठी सक्षम करतात. त्यांच्या निवडीमुळे नेपाळमध्ये लोकशाही प्रक्रियेला चालना मिळेल आणि भारताशी संबंध नव्या विश्वासाने प्रस्थापित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.