नेपाळच्या पंतप्रधानांचा घोर अपमान; स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या या बैठकीत ओली गटाचे नेते सामिल झाले नव्हते.

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्याच पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. ओली यांच्या विरोधात नेतृत्व करणाऱ्या पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड गुट यांनी पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, पंतप्रधान ओली यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. हा निर्णय पंतप्रधान ओली आणि त्यांच्या समर्थकांच्या अनुपस्थितीत घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - 'किसान गणतंत्र परेड' होणारच! सरतेेशेवटी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी​
ओली यांची प्रतिक्रिया
नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या या बैठकीत ओली गटाचे नेते सामिल झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर प्रचंड समर्थक नेत्यांच्या या निर्णयाला पंतप्रधान ओली धुडकावून लावू शकतात. पक्षातील पुष्प कमल दहल प्रचंड हे गेल्या अनेक महिन्यांपासून ओली यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. अशातच आधीपासूनच अशी शक्यता वर्तवली जात होती की राजकीय अस्थिरतेच्या वाटेवर असणाऱ्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये कधी ना कधी फूट पडणारच आहे. 

कशी बनली नेपाळ कम्युनिस्ट पार्टी
नेपाळ कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 2018 मध्ये  पंतप्रधान ओली आणि माजी पंतप्रधानांनी मिळून केली होती. त्याआधी प्रचंड यांच्या पक्षाचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओइस्ट) असं होतं. तर ओली यांच्या नेतृत्वातील पार्टीचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (एकीकृत मार्क्सिस्ट) असं होतं. दोन्ही पक्षांनी एकमेकांशी सौहार्द साधत नेपाळ कम्युनिस्ट पार्टी अथवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळची स्थापना केली.

ओली-प्रचंडमध्ये कसा सुरु झाला वाद
दोन्ही पक्षांच्या दरम्यान 2020 च्या मध्यापासूनच मतभेद सुरु झाले.  जेंव्हा ओलींवर पक्षाच्या सल्लामसलती शिवाय सरकार चालवण्याचा आरोप लावला गेला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या आणि मग समझौता झाला. मात्र, पार्टीमध्ये फार काळ शांती टिकू शकली नाही.  त्यानंतर मंत्रीमंडळाच्या वाटपावरुन परत ओढाताण सुरु झाली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepals Caretaker PM KP Sharma Oli removed from ruling Nepal Communist Party