नेतान्याहूंचा टीकाकार पत्रकार बराक रविद इस्राईलमध्ये बडतर्फ

netanyahu and barak ravid
netanyahu and barak ravid

जेरुसलेम - इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या विरोधात वार्तांकन करणारे तसेच खळबळजनक राजनैतिक बातम्या देणारे प्रख्यात पत्रकार बराक रविद यांना ‘चॅनल १३ टीव्ही’ने बडतर्फ केले आहे. त्यांच्यासह सुमारे ४० कर्मचाऱ्यांना रविवारी बडतर्फीची पत्र देण्यात आली. यात सुत्रसंचालिका ताली मॅरेनो, अनुभवी हवामानतज्ञ जॅनी रुप, राजकीय प्रतिनिधी अविका नोव्हीक अशा नामवंत व्यावसायिकांचा समावेश आहे. रवीद यांची बडतर्फी मात्र सनसनाटी मानली जात आहे. त्यातच व्यावसायिक पातळीवरील काम खराब असल्याचे कारण त्यांना देण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर्थिक सुसूत्रीकरणाचे कारण 
‘चॅनल १३’ने सांगितले की, ‘आर्थिक प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने अतुलनीय व्यावसायिकांना निरोप देणे आम्हाला भाग पडले.’

अमेरिका, युरोपीय महासंघ आणि इतर देशांबरोबरील इस्राईलच्या संबंधांबाबत सनसनाटी बातम्या दिल्याने रविद यांचा लौकिक उंचावला, पण त्यांच्या वार्तांकनावर नेतान्याहू काही वेळा नाराज झाले. त्यांनी रविद यांची जाहीर खरडपट्टी काढली होती. 
अलीकडच्या काही महिन्यांत रविद यांनी व्हाइट हाउसचे सल्लागार जॅरेड कुशनर यांची खास मुलाखत घेतली. कुशनर हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्वेसाठीचे मुख्य सल्लागार आहेत. रविद यांनी बहारीनचे शेख खालीद बीन अहमद अल्‌ खलिफा यांचीही मुलाखत घेतली. वास्तविक या अरब देशाचे इस्राईलशी राजनैतिक संबंध नाहीत.

‘राजकीय हत्या’ 
‘हारेत्झ’ दैनिकाचे राजनैतिक प्रतिनिधी तसेच रविद यांचे मित्र नोआ लॅंडाऊ यांनी ट्‌वीट केले की, ही बडतर्फी म्हणजे ‘राजकीय हत्या’ होय. 

माहितीचे ‘स्रोत’ 
रविद हे ‘ऍक्‍सिओन’ या वृत्तविषयक संकेतस्थळासाठीही लिहितात. वॉशिंग्टनच्या आतील गोटांतील व्यक्ती तसेच मध्यपुर्वेतील घडामोडींचे तज्ञ यांच्यासाठी माहितीचे "स्रोत म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com