New York : न्यू यॉर्क खचतय – भूगर्भ शास्त्रज्ञांची पाहाणी

न्यू यॉर्क पोस्ट’नुसार शहरातील दहा लाख इमारतींचं वजन 1.7 महापद्म (trillion pounds ) पौंड्स झालं असून, महाकाय उपनगर खचत आहेत
New York
New York sakal
Summary

न्यू यॉर्क पोस्ट’नुसार शहरातील दहा लाख इमारतींचं वजन 1.7 महापद्म (trillion pounds ) पौंड्स झालं असून, महाकाय उपनगर खचत आहेत

गगनचुंबी इमारतींच्या वाढणाऱ्या वजनामुळे न्यू यॉर्क शहर वर्षाकाठी एक ते दोन मिलिमीटर खचतय. `न्यू यॉर्क पोस्ट’नुसार शहरातील दहा लाख इमारतींचं वजन 1.7 महापद्म (trillion pounds ) पौंड्स झालं असून, लोअर मॅनहॅटन, ब्रुकलीन व क्वीन्स ही महाकाय उपनगरने अस्ते अस्ते खचत आहेत.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीत भूगर्भ शास्त्रज्ञांचे हे निदान व पाहणी शास्त्रीय पद्धतीने केलेल्या अध्ययनावर व अवलंबून असल्याने तो चिंतेचा विषय न ठरला तरच नवल. संशोधन अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने व र्होड आयलँड विश्वविद्यालयाने केले आहे.

न्यू यॉर्क अमेरिकेची शान असून, त्याचे टोपण नाव बिग अयापल ( Big Apple) आहे. 1920 च्या दशकात क्रीडा पत्रकार जॉन फिझेराल्ड तेथे होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीबाबत `न्यू यॉर्क मॉर्निंग टेलेग्राफ’ या वृत्तपत्रात वार्तांकन करायचा.

ज्या घोड्याने अधिकाधिक शर्यती जिंकलेल्या असायच्या, त्याला तो `बिग अयापल’ हे नाव द्यायचा. रस्ता क्र 54 व ब्रॉडवे नजिकच्या फलकावर `बिग अयापल’ हे शब्द पाहावयास मिळतात. गेल्या वर्षी मी न्यू यॉर्कला दौऱ्यात तेथील ब्रुकलीन, क्वीन्स, मॅनहॅटन्स, स्टॅटन बेट, हार्लेम आदी सर्व उपनगरांना भेट दिली होती.

शहराला पाहाण्यासाठी रोज जगातून लाखो लोक येथे येतात. वर्ल्ड ट्रेड सेन्टर नजिकच्या ऑक्युलसची शुभ्र इमारत, त्याजवळील ग्राउंड झीरो, प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर, हडसन नदीच्या किनाऱ्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाची भव्य इमारत, रॉकफेलर प्लाझा, एम्पायर स्टेट बिल्डिंग, क्रायस्लर बिल्डिंग, सीग्राम बिल्डिंग, 432 पार्क एव्हेन्यू, हडसन मधील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आदी येथील प्रमुख आकर्षणे. तसेच, ब्रुकलीन ब्रिज, मॅनहॅटन ब्रिज, जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज व क्वीन्सबरो ब्रिज या महाकाय पुलांचे वजनही न्यू यॉर्क शहराला पेलावे लागत आहे.

New York
New York Fashion Week 2023 : न्यूयॉर्क फॅशन वीकसाठी INIFDच्या 10 विद्यार्थिनींची निवड!

न्यू यॉर्क हे अटलांटिक महासागराच्या काठावरील शहर असून तेथून हडसन व हार्लेम नद्या महासागराला जाऊन मिळतात. अध्ययनात असे दिसून आले, की गगनचुंबी इमारती बांधताना पायाउभारणीसाठी लागलेल्या लोखंडाला जमिनीखालील ओलाव्यामुळे गंज चढत असून, तेथील सिमेंट काँक्रीट आदी कमकुवत होत आहे.

वर म्हटल्या प्रमाणे इमारतींच्या वजनाचा जमिनीवरील भार वाढला आहे. न्यू यॉर्क शहरावर आलेल्या सॅंडी (2012) व 2021 मधील आयडा या महाझंझावातांनी बरीच हानी झाली. अनेक उपनगरात पूर आले. त्याचे प्रमाण इतके मोठे होते, की पाण्याचा निचरा होण्यास काही दिवस लागले. इमारतींच्या खालच्या मजल्यांचा ओलेपणा जाण्यास बराच वेळ लागला. शिवाय हिवाळ्यातील बर्फाची वादळे हे दरवर्षीचे एक संकट आहे.

New York
New York : सुपरमार्केटमध्ये गोळीबार, १० जण ठार; आरोपीने केला Live Video

एटलांटिक महासागराची उंची अन्य महासागरांच्या मानाने प्रतिवर्ष 0.12 ते 0.14 इंचाने वाढत असून, ``त्याचा फटका न्यू यॉर्कवासियांना बसणार,’’ असे भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ टॉम पार्सन यांनी म्हटले आहे. न्यू यॉर्कची लोकसंख्या अंदाजे 85 लाख आहे.

`सायन्स अलर्ट’च्या संकेत स्थळानुसार, ``समुद्राकाठची जगातील अनेक शहरे 2050 पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतात.’’ उदा. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता 11 सेन्टीमीटर खचेल. याची कल्पना असल्यामुळे जकार्तातील पावणे दोन कोटी लोकांना कालांतराने अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे.

अर्थात, याचा विचार तेथील राज्यकर्त्यांना करावा लागेल. 2022 मध्ये करण्यात आलेल्या सागर किनाऱ्यावर वसलेल्या शहरांच्या पाहाणीनुसार, जमीन खचण्याचे प्रमाण दक्षिण, दक्षिण पूर्व व पूर्व आशियात सर्वाधिक आहे. उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व युरोपनेही अनेक शहारांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

New York
North York : एका दिवसांत मालामाल; नवरा-बायकोला सापडली तब्बल अडीच कोटींची नाणी

ग्रामीण भागाकडून शहरांकडे स्थलांतर होत आहे, तसा शहरांवरील भार वेगाने वाढत असून, जमीन, पाणी, हवामान, रस्ते, जीवनावश्यक सोयी यांचा ताण वाढत आहे. 2015 ते 2020 अखेर करण्यात आलेल्या 95 शहरांच्या पाहणीचा निष्कर्ष चिंताजनक आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून काही देश पाण्याखाली जातील,

याची सर्वाधिक भीती महासागरातील बेट वजा देशांना असून, हिंद महासागताली मालदीव ते प्रशांत महासागरातील पॉलिनेशिया, मायक्रोनेशिया, मेलानेशशिया या त्रिकोणातील तुनालू, वानाताऊ, वानुवाटू, ताहिती, किरीबाटी, फिजी, टोंगा आदी देशांना धोका संभवतो.

अहमद नशीद हे मालदीवचे पंतप्रधान असताना त्यांनी या संकटाकडे जगाचे लक्ष वळविण्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक समुद्राच्या पाण्याखाली घेतली होती.

वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढतेय, तसा हवामानावर बदलावर विपरित परिणाम होत आहे. जगात अकाली येणारे पूर, वणवे, समुद्री वादळे, वेगाने वितळणारे आर्क्टिक व अंटार्क्टिकातील बर्फाचे स्त्रोत या सर्वाचा परिणाम शहरांवर होत आहे.

तुर्कस्तानमधील इस्तंबूल (लोकसंख्या 15 दशलक्ष) नायजेरियातील लागोस, (24 दशलक्ष), तैवानची राजधानी तैपेई (2.7 दशलक्ष), मुंबई (अंदाजे 20 दशलक्ष -दोन कोटी), न्यूझीलँडमधील ऑकलंड ( 1.6 दशलक्ष), अमेरिकेतील फ्लॉरिडाच्या टँम्पा बे ( 3 दशलक्ष) व तेथील 25 कि.मीचा किनारा येथे जमीनीचा खच वेगाने होत आहे.

बांग्लादेशमधील चित्तगाँग, चीनमधील तियांजिन, पाकिस्तानमधील कराची, फिलिपीन्समधील मनिला या चार शहरात पाच कोटी 90 लाख लोक राहातात. जमीन खचण्याचा फटका केवळ या शहरांना बसणार नाही, तर तेथील कारखाने, उद्योग आदी सर्वांना बसेल. जकार्ता व शांघाय या महानगरातील भूखचाचे प्रमाण काहीसे मंदावले आहे.

New York
North York : एका दिवसांत मालामाल; नवरा-बायकोला सापडली तब्बल अडीच कोटींची नाणी

शांघायने केव्हाच न्यू यॉर्कची बरोबरी केली आहे. न्यू यॉर्कमध्ये उत्तुंग इमारतींची तीन मॅनहॅटन्स आहेत. लोअर, अपर व मिड्ल मॅनहॅटन्स. त्यातील लोअर मॅनहॅटन वेगाने खचते आहे. तसेच, शांघायही खचणार, असा अंदाज काही वर्षांपूर्वी केला जात होता. कारण, तिथं तर न्यू यॉर्कमधील तीन मॅनहॅटन पेक्षा किमान 15 ते 20 मॅनहॅटन्स् आहेत.

शांघायच्या काही वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीत ते मी पाहिले होते. त्यामुळे, तेथील इमारतींचे वजन निश्चितच न्यू यॉर्कमधील इमारतींपेक्षा अधिक आहे. शांघाय ही चीनची जगासाठी असलेली प्रगतीची `शोकेस’ आहे. त्यामुळे चीनी राज्यकर्त्यांना या धोक्यापासून वाचण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागतील. शहरांचे खचणे ही प्रक्रिया सामान्य माणसाला दिसत नाही, किंवा ध्यानी येत ऩाही.

कारण भूगर्भातील हालचाली अत्यंत धीमेपणे होत असतात. त्यांचे दृष्य परिणाम काही वर्षांनी अचानक दिसू लागतात. तोवर वेळ गेलेली असते. कितीही आधुनिक प्रगती झालेली असली, विज्ञानाने कितीही भरारी मारली असली, माणूस मंगळावर जाण्याची तयारी करीत असला, तरी नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची ताकद अद्याप कोणत्याही देशात नाही, असेच दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com