esakal | न्यूझीलंड: हल्लेखोराचा ६० सेकंदात खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूझीलंड: हल्लेखोराचा ६० सेकंदात खात्मा

न्यूझीलंड: हल्लेखोराचा ६० सेकंदात खात्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेलिंग्टन : न्यूझीलंडमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये एका माथेफिरूने शुक्रवारी सुपरमार्केटमधील सहा जणांवर चाकू हल्ला केला. आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास झालेल्या या घटनेतील संशयितावर पोलिसांचे लक्ष होते. त्यामुळे हल्ला केल्यानंतर ६० सेकंदातच त्यांनी त्‍याच्यावर गोळ्या झाडून ठार केले.

हेही वाचा: पंजशीरमध्ये लढाई, वयोवृद्धांचा 'माइन क्लियरन्स टुल' म्हणून वापर

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला. हा हल्ला हिंसक व निर्दयी होता. हल्लेखोर हा श्रीलंकेचा होता आणि ‘इसिस’चा प्रभाव त्‍याच्यावर होता. तो २०११ पासून न्यूझीलंडमध्ये आला. राष्ट्रीय सुरक्षा संघटनेने २०१६ पासून त्यावर पाळत ठेवली होती. या घटनेबद्दल अर्डर्न यांनी जनतेटी माफी मगितली आहे. राष्ट्रीय सुरक्षा संघटनेला त्याची माहिती होती. पण त्याला अटक करण्‍यासाठी कोणतेही कायदेशीर कारण नव्हते, असे अर्डर्न म्हणाल्या.

हल्ला झालेल्या सहा जणांपैकी तीन जण सुपरमार्केटमधील दुकानचालक असून गंभीर स्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती नाजूक असून अन्य दोघांची प्रकृती साधारण आहे.

हेही वाचा: जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचा Re-Election न लढण्याचा निर्णय

ऑकलंड पोलिसांचे पाळत पथक व विशेष रणनीती गट संशयित हल्लेखोराच्या घरापासून त्याच्या पाळतीवर होते. सुपरमार्केटमध्ये तो सामान खरेदी करण्यासाठी जाईल, असे त्यांना वाटले होते. पण त्याने हल्ल्याचा कट रचला असेल, अशी शंका त्यांना आली नाही. यापूर्वीही तो तेथे गेला होता. मात्र यावेळी त्याने आत प्रवेश केल्यावर एक चाकू खरेदी केला.

त्याच्या हालचाली टिपण्याच्या अंतरावर पाळत पथक होते. सुपरमारर्केटमध्ये गोंधळ सुरू झाला त्यावेळी विशेष गटाचे दोन पोलिस तेथे पोचले, तेव्हा माथेफिरू त्वेषाने अधिकाऱ्याच्या दिशेने धावल्याने पोलिसांनी त्‍याच्यावर गोळीबार करुन ठार केले. पोलिस आयुक्त अँड्र्यू कोस्टर यांनी सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी काही जणांनी या घटनेचे चित्रण केले असून दहा गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवादी विचारसरणी ही न्यूझीलंडमध्ये दुर्मीळ आहे. देशात अशा काही लोकांवर पाळत ठेवलेली आहे.- जेसिंडा अर्डर्न, पंतप्रधान, न्यूझीलंड

loading image
go to top