न्यूझीलंडने कोरोना मुक्तची घोषणा केली अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 16 June 2020

न्यूझीलंडमधील अखेरचा कोरोनारुग्ण बरा झाला असल्याने हा देश सध्या तरी कोरोनामुक्त झाल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

वेलिंग्टन: न्यूझीलंडमधील अखेरचा कोरोनारुग्ण बरा झाला असल्याने हा देश सध्या तरी कोरोनामुक्त झाल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, देशात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुशांतच्या वहिनीनेही सोडला प्राण...

न्यूझीलंडमध्ये 25 दिवसांपूर्वी कोरोनाच्या अखेरच्या रुग्णाची नोंद झाली होती. हा रुग्णही बरा झाला होता. यावेळी न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, यामुळे सरकार गाफिल राहणार नसून, यापुढेही संसर्ग न पसरण्यासाठी सर्व प्रकारे काळजी घेणार असल्याचे देशाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, 'सध्या तरी आम्ही कोरोनापासून मुक्त झालो आहोत. सातत्याने प्रयत्न करत राहिल्याचा हा परिणाम आहे. न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडू शकतात. मात्र, हे आमचे अपयश नसून विषाणूचे हेच वास्तव आहे. नवा रुग्ण सापडताच त्याचा फैलाव रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे आमच्या हातात आहे.' देश कोरोनामुक्त झाल्यानंतर लॉकडाउन काळातील सर्व बंधने उठविली गेली होती. विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक हे सर्व पूर्वीप्रमाणे सुरु झाले होते.

भूत व्यायाम करतं? व्हिडिओ व्हायरल...

न्यूझीलंडने गेल्याच आठवड्यात देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करत सर्व निर्बंध काढले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर अजूनही बंदी आहे. यात केवळ परदेशात अडकलेले न्यूझीलंडचे नागरिक आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच मायदेशात परण्याची मुभा देण्यात आली आहे. देशात दोन नवीन रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,506 झाली आहे, तर कोव्हिड-19 आजारामुळे तिथे आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या जवळपास 200 देशांमध्ये लॉकडाऊन वेगवेगळ्या स्वरुपात अजूनही लागू असताना न्यूझीलंडने मात्र सर्व प्रकारचे निर्बंध उठवले होते. देशात कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण न आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

Video: पाकिस्तानच्या धर्मगुरुचा कोरोनाबाबत अजब दावा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new zealand is no longer coronavirus free two fresh cases detected