पंतप्रधानांच्या चालू FB live मध्ये लेकीची करामत! PM ने मागितली जनतेची माफी | New zealand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new zealand pm

New zealand | पंतप्रधानांच्या चालू FB live मध्ये लेकीची धमाल!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ही घटना 8-9 नोव्हेंबर 2021 च्या रात्रीची... न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न ‘फेसबुक लाईव्ह’ (facebook live) कार्यक्रमात कोविड-19 महामारीवर (corona pandemic) देशातील जनतेला संबोधित करत होत्या. ते फेसबुक लाईव्ह त्यांच्या ऑफिसमधून सुरू होते. पण त्याच वेळी त्यांच्या अडीज वर्षाच्या लेकीने चालू लाईव्हमध्ये असे काही केले की सर्वच आश्चर्यचकित झाले...काय घडले नेमके?

पंतप्रधानांच्या चालू facebook live मध्ये लेकीची धमाल

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात कोविड-19 महामारीवर देशातील जनतेला संबोधित करत होत्या. ते फेसबुक लाईव्ह त्यांच्या ऑफिसमधून चालू होते सध्या न्यूझीलंडची कोविड वाईट परिस्थिती आहे, त्यामूळे देशातील जनतेने सरकारी यंत्रणेसोबत मिळून या साथीचा सामना कसा करायचा. हे पंतप्रधान सांगत होत्या.

कोरोनाला तोंड देण्यासाठी त्यांनी खबरदारी आणि नियमांचे पालन या बाबत पंतप्रधान सांगत होत्या. तेवढ्यात, पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांची अडीच वर्षांची मुलगी नीव-जी तिच्या आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. ती तीच्या आई जवळ आली. त्या वेळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम चालूच होता. झोपेतून जागी झालेल्या मुलीशी बोलून त्याला तीला समजावू लागल्या. अन्..

लाईव्ह कार्यक्रमात जनता झाली थक्क

पंतप्रधान आर्डर्न यांनी मुलगी नीवला सांगितलं की, त्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करत आहे. रात्रीची वेळ आहे. मुलीने आजीकडे जाऊन झोपावे. न्यूझीलंडच्या लोकांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. लाईव्ह कार्यक्रमात तेव्हा तेही ही सर्व थक्क झाले. देशाचे पंतप्रधान आणि आई या देऊनही भुमीका एकाच वेळी निभवत असणाऱ्या आर्डर्न यांनी वारंवार समजवून ही मुलगी एैकत नव्हती.

हेही वाचा: 'गांधींच्या भिकेच्या कटोऱ्यातून मिळालं स्वातंत्र्य, जा आता रड'!

न्यूझीलंडच्या PM ने मागितली लोकांची माफी

आईला सोबत घेतल्याशिवाय झोपणार नाही, असा नीवचा हट्ट होता. या सगळ्यामध्ये पंतप्रधानांनी तीन-चार वेळा थेट कार्यक्रमात न्यूझीलंडच्या लोकांची माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली. महिला पंतप्रधानांनी काही गडबड न करता, अतिशय हुशारीने आणि संयमाने परिस्थितीत सांभाळली. पंतप्रधानांनी पहिला न्यूझीलंडच्या लोकांची माफी मागितली, त्याचवेळी त्यांनी देशातील जनतेला सांगितले की, “माझी आई यावेळी माझ्या मुलीसोबत उपस्थित आहे हे भाग्याचे आहे. त्या तीची काळजी घेतात. एवढेच नाही तर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी जनतेला विचारले की, “फेसबुक लाईव्हसाठी ही वेळ योग्य असेल का? दुसऱ्याची मुलं सुद्धा रात्री तीन-चार वेळा उठतात का?” या सगळ्यामध्ये मुलगी नीव पुन्हा लाईव्ह कार्यक्रमाच्या मध्ये येते आणि आईला विचारू लागते, तिला इतका वेळ का लागतोय?

हेही वाचा: हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनांशी करणाऱ्या माजी मंत्र्याविरुध्द गुन्हा

मला हा कार्यक्रम मध्येच थांबवावा लागेल

अखेर आपल्या मुलीच्या आग्रहापुढे आपण जिंकू शकणार नाही असे पंतप्रधान जॅसिंडा यांना वाटू लागल्यावर त्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात देशवासीयांची माफी मागितली आणि कदाचित आता मला हा कार्यक्रम मध्येच थांबवावा लागेल असे सांगितले. नीवची झोपायची वेळ झाली आहे. आणि आता मला सोबत घेऊनच ती झोपू शकेल. शेवटी, फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी असलेल्या न्यूझीलंडच्या लोकांचे आभार मानून पंतप्रधानांनी कार्यक्रम थांबवला.

loading image
go to top