esakal | न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांना नो एन्ट्री; कोरोनाच्या उद्रेकामुळे घेतला निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

jescinda ardern

न्यूझीलंडमध्ये बुधवारी 7 नवीन रुग्ण आढळले. ऑक्टोंबरनंतर ही सर्वाधिक संख्या असल्याचंही आर्डर्न यांनी सांगितलं. 

न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांना नो एन्ट्री; कोरोनाच्या उद्रेकामुळे घेतला निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वेलिंग्टन - न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी मोठी घोषणा करताना भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. न्यूझीलंडने 28 एप्रिलपर्यंत सर्व प्रवाशांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण सापडत असताना न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसंच 28 एप्रिलपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

जेसिंड आर्डर्न यांनी म्हटलं की, सध्या कोरोनाच्या जगभरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एका देशापुरता मर्यादित असा निर्णय नाही. खबरदारी म्हणून प्रवाशांना देशात येण्यास बंदी घातल्याचंही आर्डर्न यांनी स्पष्ट केलं. न्यूझीलंडमध्ये बुधवारी 7 नवीन रुग्ण आढळले. ऑक्टोंबरनंतर ही सर्वाधिक संख्या असल्याचंही आर्डर्न यांनी सांगितलं. न्यूझीलंडच्या सीमेवर 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी 17 जण भारतातलेच होते. त्यामुळे न्यूझीलंडने तात्काळ प्रवाशांसाठी बंदीचा निर्णय घेतला.

हे वाचा - भारतात लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील; WHO चा इशारा

जगात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये भारत सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच जगात एका दिवसामध्ये सर्वाधिक रुग्ण भारतातच सापडत आहेत. तर अमेरिकेनंतर रिकव्हरी झालेल्या रुग्णांची संख्याही भारतात जास्त आहे. मृत्यूदर मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. 

हे वाचा - ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीची लहानग्यांवरील ट्रायल थांबवली; रक्तात गुठळ्यांची तक्रार

भारतात कोरोना प्रतिबंधक लशीच्या लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत देशातील 8 कोटी 70 लाख नागरिकांना कोरोनाचा डोस देण्यात आले आहेत. बुधवारी देशात 33 लाख 37 हजार जणांना लस दिली. कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यास 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. 

loading image