
वॉशिंग्टन - जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. युरोपातील काही देशांनी महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता जर्मनीनेसुद्धा लॉकडाऊन केलं आहे. त्यातच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी रविवारी असा इशारा दिला की, कोरोनाच्या साथीमध्ये पुढचे चार ते सहा महिने खूप वाईट असू शकतील. बिल गेट्स यांची संस्था कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असून जगभरात वितरीत कशी करता येईल यावरही काम सुरू आहे.
गेट्स यांनी म्हटलं की, कोरोनाच्या साथीच्या काळात पुढचे चार ते सहा महिने खूपच वाईट असू शकतात. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड रिव्होल्यूशनच्या अंदाजानुसार आणखी दोन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. जर आपण मास्क घातला, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं तर हे मृत्यू रोखता येतील.
अमेरिकेत कोरोनाने सर्वाधिक हाहाकार माजवला आहे. याबाबत बोलताना गेट्स यांनी सांगितलं की, गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मला वाटतं की, अमेरिका या परिस्थितीचा सामना करण्यासाठी चांगलं काम करेलं.
गेट्स यांनी 2015 मध्येच अशा प्रकारच्या संकटाबाबत जगाला इशारा दिला होता. ते म्हणाले की, जेव्हा 2015 मध्ये मी अशा एखाद्या संकटाबद्दल बोललो होतो तेव्हा मृत्यूची संख्या अधिक असण्याची शंका व्यक्त केली होती. सध्या हा व्हायरस जितका घातक आहे त्यापेक्षाही धोकादायक असू शकतो. अजुनही आपण कठीण काळ पाहिलेला नाही. यात धक्कादायक बाब म्हणजे अमेरिका आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम. कारण पाच वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने तो अधिक आहे असंही बिल गेट्स यांनी सांगितलं.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आतापर्यंत जगभरात 7 कोटी 26 लाख 44 हजार 125 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 16 लाख 18 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला तर 5 कोटी 8 लाख 64 हजार 105 रुग्ण बरे झाले आहेत. जगात अमेरिकेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत असून तिसऱ्या स्थानी ब्राझील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.