Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

JNIM Al-Qaeda Niger : नायजरच्या नियामे येथील डिओरी हमाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अल-कायदाशी संबंधित दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात किमान ११ सैनिक आणि २ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले.
Niamey Terror Attack

Niger Airport Attack 

esakal

Updated on

Niamey Terror Attack: आफ्रिकेतील नायजर या देशाची राजधानी असलेल्या नियामे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात नायजरचे किमान ११ सैनिकासंह २४ नागरिक मारले गेले. मात्र, सुरक्षा दलांनी त्वरित या हल्ल्याला प्रत्युत्तर देत २२ हल्लेखोरांना घटनास्थळीच ठार केले. या हल्ल्याची तीव्रता यावरून लक्षात येते की, अनेक तास विमानतळ आणि आसपासच्या परिसरात सतत गोळीबाराचा आवाज घुमत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com