esakal | नायजेरीयाला कोरोनापेक्षा कॉलराचा धोका जास्त; २३००हून अधिकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नायजेरीयाला कोरोनापेक्षा कॉलराचा धोका जास्त; २३००हून अधिकांचा मृत्यू

नायजेरीयाला कोरोनापेक्षा कॉलराचा धोका जास्त; २३००हून अधिकांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लागोस : नायजेरियामध्ये कॉलराचा उद्रेक झाला असून या वर्षभरात २३०० हून अधिक जणांचा या रोगामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. कोरोनाची जागतिक साथ सुरु असतानाच नायजेरियाला या दुसऱ्या संकटालाही तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

नायजेरियामध्ये कॉलरामुळे अनेक जण मृत्युमुखी पडतात. मात्र, या वर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या चार वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांत कॉलराकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम असल्याचे येथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात, आफ्रिका खंडातील या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात आतापर्यंत केवळ एक टक्के जणांना लस मिळाली आहे. नायजेरियाच्या साथरोग नियंत्रण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या वर्षी पाच सप्टेंबरपर्यंत देशातील ३६ पैकी २५ राज्यांमध्ये मिळून कॉलराचे ६९ हजार ९२५ संशयित रुग्ण आढळून आले. या साथीचा सर्वाधिक फटका पाच ते १४ या वयोगटाती बालकांना बसला आहे. देशात कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १.३ टक्के असताना काँलरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ३.३ टक्के आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

नायजेरियामध्ये या वर्षी कॉलरामुळे २,३२३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र, दुर्गम भागात राहणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने आणि तेथेही साथीचा फैलाव झाला असल्याने मृतांची संख्या सरकारी आकड्यापेक्षा बरीच अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

साथीला पूरक वातावरण

नायजेरियामध्ये कॉलराची साथ कायम येत असते. या देशातील वीस कोटी लोकसंख्येपैकी केवळ १४ टक्के लोकांनाच पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होते. सरकारी माहितीनुसार, १४ राज्यांमधील ३० टक्के जनता उघड्यावर शौचास जाते. त्यामुळेच येथे पीतज्वर, कॉलरासह अनेक साथी येत असतात. देशाच्या उत्तर भागातील राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधांची स्थिती यथातथाच असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे.

loading image
go to top