Maldives Fire Accident : मालदीवमधील भीषण आगीत नऊ भारतीयांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maldives Fire Accident

Maldives Fire Accident : मालदीवमधील भीषण आगीत नऊ भारतीयांचा होरपळून मृत्यू

Maldives Fire Accident : राजधानी माले येथे गुरुवारी परदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या आगीत किमान नऊ भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एएफपी वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.

अधिका-यांनी सांगितले की, ज्या इमारतीला आग लागली होती. तेथून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, यातील नऊ जण हे भारतीय तर एक जण बांग्लादेश येथील आहे.

हेही वाचा: CIBIL Score : आता WhatsApp सांगणार तुमचा CIBIL Score; जाणून घ्या, कसा तपासणार

या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी +९६०७३६१४५२ आणि +९६०७७९०७०१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Children’s Day : मुलांना टीव्ही,मोबाईलपासून दूर करायचंय? खरेदी करा 'ही' इंटरेस्टिंग पॉपअप पुस्तकं

अशी घडली घटना

या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार गॅरेजमध्ये भीषण आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इमारतीच्या वरील मजल्यावर दहा जणांचे मृतदेह आढळून आले. ज्यात नऊ भारतीयांचा तर, एका बांग्लादेशी नागरिकाचा समावेश आहे.

टॅग्स :Fire Accident