कोरोनावर लस प्रभावी ठरेल अशी शाश्वती नाही - WHO

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कोरोना प्रादूर्भावाला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लशींमधील एखादी लस काम करेल कि नाही याची कसलीही शाश्वती आरोग्य संघटनेकडे नाही..

जगभरात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 131 हजार लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामधील 9 लाख 75 हजार लोकांचा आजवर मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 34 लाखाहून अधिक लोक कोरोनापासून मुक्त झाले आहेत. संपूर्ण जगात 74 लाखाहून अधिक अॅक्टीव्ह केसेस सध्या आहेत. कितीतरी देशात सध्या कोरोनावर लस बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यादरम्यानच, जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आरोग्य संघटनेकडून आलेल्या या वक्तव्यामुळे आता काळजीने भुवया उंचावण्याची शक्यता आहे. कारण संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी म्हटलंय की, कोरोना प्रादूर्भावाला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लशींमधील एखादी लस काम करेल कि नाही याची कसलीही शाश्वती आरोग्य संघटनेकडे नाही..

ट्रेडोस अधनोम यांनी मंगळवारी हे वक्तव्य  पत्रकारांना माहिती देताना केलं. त्यांनी म्हटलं की याची काहीच खात्री नाहीये तयार होत असणाऱ्या लशी या काम करतीलच. पण त्यांनी हेही सांगितलं की, जितक्या जास्तीतजास्त लोकांवर या लशींची चाचणी होईल तितकीच चांगली आणि प्रभावशाली लस निर्माण करण्यात यश प्राप्त होईल. 

हेही वाचा - चीनला हवीय शांतता! युद्ध किंवा शीतयुद्ध नको असल्याचं UN मध्ये केलं वक्तव्य

ऑक्सफर्डची लस आहे सर्वांत पुढे
कोरोना व्हायरसवर लस निर्माण करण्यासाठी जगभरात जवळपास 180 पर्यांयावर काम सुरु आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत कारण ही लस चाचणीमधून येणाऱ्या सकारात्मक निष्कर्षांमध्ये सर्वांत पुढे आहे, असं आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचंही म्हणणं आहे. 

हेही वाचा - 'चीनने कोरोना लपवण्याचा प्रयत्न केला, WHO सुद्धा या कटात सहभागी'

भारतात कधीपर्यंत येईल लस?
केंद्रीय स्वास्थ्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसवरील लस भारतात पुढच्या वर्षाच्या सुरवातीलाच उपलब्ध करून दिली जाईल. त्यांनी राज्यसभेत म्हटलं की, इतर देशांप्रमाणेच, भारतातदेखील प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी संबधित तीन लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरु आहे. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ञांचा समूह या लशींच्या घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहे. आम्हाला आशा आहे की पुढच्या वर्षाच्या सुरवातीलाच भारतात एक लस जरूर उपलब्ध होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no garantee any covid 19 vaccine including oxford says world health organisation