कोरोनाचा कोणताही अडथळा आमच्या संबंधांमध्ये आला नाही

पीटीआय
Thursday, 7 January 2021

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या द्वीपक्षीय संबंधांवर कोरोना परिस्थितीचा कोणताही परिणाम झाला नसून आम्ही आता कोरोना नंतरच्या काळातील सहकार्यासाठी उत्सुक आहोत, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले. जयशंकर हे श्रीलंका दौऱ्यावर आहेत.

कोलंबो - भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या द्वीपक्षीय संबंधांवर कोरोना परिस्थितीचा कोणताही परिणाम झाला नसून आम्ही आता कोरोना नंतरच्या काळातील सहकार्यासाठी उत्सुक आहोत, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले. जयशंकर हे श्रीलंका दौऱ्यावर आहेत. 

विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू

जयशंकर यांनी आज श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री दिनेश गुणवर्धना यांची भेट घेतली. या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, कोरोनाचा कोणताही अडथळा आमच्या संबंधांमध्ये आला नाही. याउलट या परिस्थितीमुळे आणखी जवळून काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेली व्हर्च्युअल बैठक हे त्याचेच निदर्शक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता आम्ही कोरोना नंतरच्या काळात सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहोत. भारताने विकसीत केलेली कोरोना प्रतिबंधक लस श्रीलंकेला हवी असून त्यांनी तशी औपचारिक मागणीही जयशंकर यांच्याकडे आज केली.

ब्रेकफास्ट अपडेट्सः ट्रम्प समर्थकांचा धुडगूस ते आनंदी पुणेकर; ठळक घडामोडी एका क्लिकवर 

दोन देशांच्या पंतप्रधानांदरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी आज ती पुढे नेली. या चर्चेदरम्यान दहशतवादाविरोधात कारवाई, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No interruptions from Corona came into our relationship s jaishankar