HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन

ल्यूक माँटग्नियर यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी २००८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता
Luc Montagnier
Luc Montagnierटिम ई सकाळ

एचआयव्ही (HIV) व्हायरसचा शोध लावणारे फ्रान्सचे संशोधक ल्यूक माँटग्नियर (Luc Montagnier) यांनी मंगळवारी वयाच्या ८९व्या वर्षी पॅरिस उपनगरातील न्यूली-सुर-सीन येथे अखेरचा श्वास घेतला.

ल्यूक माँटग्नियर यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी २००८ साली नोबेल पुरस्कार (nobel-prize) देण्यात आला होता. एचआयव्ही विषाणूवर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी बनवल्या गेलेल्या प्रतिबंधात्मक लसींना त्यांनी जाहीरपणे विरोध केला होता. त्यामुळे ते चर्चेस आले होते.

Luc Montagnier
तत्काळ युक्रेन सोडा; जो बायडेन यांचे अमेरिकन लोकांना आदेश, युद्धाचेही संकेत

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी गुरुवारी ल्यूक माँटग्नियर यांना श्रद्धांजली वाहिली. एड्सविरूद्ध लढाईत त्यांचं योगदान अमुल्य होतं, असं म्हणत मॅक्रॉन यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com