
उत्तर कोरियाचा हुकुमशाह सत्ताधीश किम जोंग उन हा आपल्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशाह सत्ताधीश किम जोंग उन हा आपल्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. त्याच्या क्रूरतेची आणखी एक बातमी सध्या समोर येतीय. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण उत्तर कोरियामध्ये लॉकडाऊन तर लावला गेलायच सोबतच तिथल्या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक शिक्षा देखील दिली जात आहे. आणि ही शिक्षा साधीसुधी नसून मृत्यूदंडापर्यंत गंभीर असू शकते. किम जोंग उनसाठी लोकांना मृत्यूदंड देणे ही तशी अत्यंत सामान्य बाब आहे.
हेही वाचा - अबब! 2 महायुद्धे, UK चे 7 राजे, US चे 39 राष्ट्राध्यक्ष पाहिलेले 188 वर्षांचे कासव
मीडियातील रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच उत्तर कोरियात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. आणि याचं कारण म्हणजे कोरोनाबाबतीत देशांत लावलेल्या प्रतिबंधांचं त्याने उल्लंघन केलं होतं. किम जोंग उनला या उल्लंघनाबाबत समजताच त्याला मृत्यूदंड फर्मावला गेला. किम जोंग उनने या व्यक्तीला मृत्यूदंड फर्मावला. त्याला फायरिंग स्कॉडच्या मार्फत ठार करण्यात आलं. त्याला सार्वजनिक रित्या गोळ्यांनी उडवण्यात आलं. मीडियातील रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उनने आपल्या नागरिकांमध्ये दहशत राखण्यासाठी चीनच्या सीमेवर एँटी एअरक्राफ्ट बंदुकासहीत सैन्य तैनात केलं आहे. सीमेपासून जवळपास एक किलोमीटर लांबून कोणत्याही व्यक्तीला ठार केलं जाऊ शकतं. किम जोंग यांनी तसे आदेशच दिले आहेत.
हेही वाचा - लस आली म्हणजे 'कोरोना' संपला असं समजू नका; WHOच्या प्रमुखांनी दिला इशारा
डेली मेल या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानुसार, किम जोंग उन यांनी 28 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला कोरोनाचे प्रतिबंध न पाळल्याबद्दल मृत्यूदंड ठोठावला आहे. त्या व्यक्तीने उत्तर कोरियामध्ये चीनी सामानांची तस्करी केली होती. असं करताना त्याला स्थानिक सुरक्षा दलाने पकडलं होतं. यानंतर त्याला दिवसाढवळ्या गोळ्यांनी उडवण्यात आलं.