esakal | उत्तर कोरियाकडून घातक क्रूझ मिसाइलची टेस्ट, दक्षिण कोरिया, जपानला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

North Korea

उत्तर कोरियाकडून घातक क्रूझ मिसाइलची टेस्ट, दक्षिण कोरिया, जपानला धोका

sakal_logo
By
दीनानाथ परब

सेऊल: मागच्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या उत्तर कोरियाने (north korea) पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. मागच्या आठवड्याच्या अखेरीस उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी (cruise missile test) केल्याचे वृत्त सरकारी माध्यमाने दिले आहे. या चाचणीनंतर 'अत्यंत महत्त्वाचे रणनीतीक शस्त्र' असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. अण्वस्त्र कार्यक्रमावरुन उत्तर कोरियाचा अमेरिका (america) आणि दक्षिण कोरिया (south korea) बरोबर वाद सुरु आहे.

रोडाँग सीनमन वर्तमानपत्रात या मिसाइल चाचणीचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मिसाइल लाँचिंग वाहनावरील पाच पैकी एका ट्युबमधून लक्ष्याच्या दिशेने मिसाइल निघाल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. उत्तर कोरियाची ही क्षेपणास्त्र चाचणी शेजाऱ्यांबरोबरच अन्य देशांसाठीही धोक्याची घंटा आहे, असे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे.

हेही वाचा: तालिबान सरकारमध्ये महिलांना स्थान नाहीच! सुहैल शाहीन यांची 'सकाळ'कडे स्पष्टोक्ती

"या कृतीमधुन उत्तर कोरियाने लष्करी कार्यक्रम विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. यामुळे शेजारी देशांबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायालाही धोका आहे" असे अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे क्षेपणास्त्र म्हणजे उत्तर कोरियाची शस्त्रास्त्र टेक्नोलॉजी अधिक अत्याधुनिक झाल्याचे लक्षण आहे, असे विश्लेषक सांगतात.

हेही वाचा: भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा

शनिवार आणि रविवारी ही चाचणी झाली, असे अधिकृत कोरियन न्यूज एजन्सीने म्हटले आहे. लक्ष्यभेद करण्याआधी या क्षेपणास्त्राने १५०० किलोमीटरचा पल्ला गाठला, असे केसीएनएने म्हटले आहे. अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रमामुळे उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. अमेरिकेपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी हा शस्त्रास्त्र कार्यक्रम सुरु असल्याचं उत्तर कोरियाचं म्हणणं आहे.

loading image
go to top