किम जोंग उन आहेत जिवंत; हा आहे पुरावा!

Kim_Jong_Un
Kim_Jong_Un

बॅंकॉक : सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाविरोधात लढा देत असताना ज्या देशातून कोरोनाची उत्पत्ती झाली त्या चीनने कोरोनावर संपूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.

चीनने कोरोनाच्या जागतिक साथीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवल्याबद्दल उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना वैयक्तिक संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. 

येथील योनहॅप या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या संदेशात किम जोंग यांनी जिनपिंग यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत म्हटले की, चीनने गंभीर अशा कोरोना आजारावर विजय मिळवला. त्याचबरोबर आपल्या संदेशात किम म्हणाले की, चीनमधील लोक हे यश कायम राखतील आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होतील. तसेच त्यांनी राष्ट्रपतींच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र आहे. उत्तर कोरियाचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनामुळे मागच्या काही महिन्यात चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठया प्रमाणावर कमी झाला होता.

दरम्यान, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे नवे १२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रुग्णसंख्या १०,८२२ झाली असून आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या जसजशी कमी होत गेली तसतसे सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध कमी करण्यात आले आहेत. तेथील शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

दुसरीकडे, चीनमध्ये सापडलेल्या १६ नव्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, असे हॉस्पिटल प्रशासनाने जाहीर केले. आतापर्यंत चीनमध्ये ८२,८८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४६३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनने आपल्या फुटबॉल संघातील खेळाडूंचे वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चीन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख चेन झ्युआन यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com