ज्यो बायडेन यांना सर्व काही सोपे नाही : कमला हॅरिस

पीटीआय
Wednesday, 20 January 2021

अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन हे बुधवारी (ता. २०) शपथ घेतील, त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर असेल, ती आव्हाने पार करणे हे सोपे काम नाही, असे नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आज कबूल केले.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन हे बुधवारी (ता. २०) शपथ घेतील, त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर असेल, ती आव्हाने पार करणे हे सोपे काम नाही, असे नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आज कबूल केले. अनेक आव्हानांपैकी कोरोना संकटातून देशाला बाहेर काढणे, हे त्यातील सर्वांत मोठे आव्हान असेल, असे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेतील राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना हॅरिस म्हणाल्या,‘‘आमच्यासमोर आव्हानांचा डोंगर असेल, हे शपथ घेताना आम्हाला निश्‍चितपणे माहिती आहे. आम्ही काम करण्यास तयार आहोत. मात्र, हे आव्हान सोपे असणार नाही. कोरोना संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आमची योजना तयार आहे. लसीकरण आणि मदत कार्य याबाबतही नियोजन झाले आहे. आमची उद्दीष्ट्ये फारच महत्त्वाकांक्षी वाटत असली तरी सर्वांचे सहकार्य आणि परिश्रमाच्या जोरावर ते साध्य करता येईल.’’ शपथविधीच्या कार्यक्रमात ट्रम्प समर्थकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता असल्याबाबत प्रश्‍न विचारला असता, आम्ही विनाअडथळा आणि अभिमानाने शपथ घेऊ याबद्दल मला विश्‍वास आहे, असे उत्तर हॅरिस यांनी दिले.   

'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण

कृष्णवर्णीयांचा सन्मान
डेट्रॉइट : जगातील सर्वाधिक शक्तीमान देशातील सत्तांतराचा सोहळा एका दिवसावर येऊन ठेपला असून नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उद्या (ता. २०) होणाऱ्या शपथविधीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव; 31 जानेवारीपर्यंत देणार राजीनामा?

कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांची संस्कृती आणि शौर्य यांचे प्रदर्शन ही यानिमित्ताने सादर होणाऱ्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. ज्यो बायडेन यांच्या विजयात अमेरिकेतील कृष्णवर्णीय मतदारांचा मोठा वाटा होता. 

‘साम’वर विशेष कार्यक्रम
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ज्यो बायडेन बुधवारी (ता. २०) घेत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विशेष कार्यक्रम पाहा साम वाहिनीवर रात्री ९ ते १०.३०

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not everything is easy for Joe Biden kamala harris