Rain Tax: आता पावसाच्या पाण्यावरही लागणार टॅक्स! या देशाने सुरु केली तयारी; वाचा काय आहे प्रकार?

Tax on rain water Canada: ज्या वस्तू वापरल्या जातात किंवा विकत घेतल्या जातात त्यावर सरकारकडून टॅक्स लावला जातो. वस्तू किंवा मालमत्तेवर टॅक्स लावला जातो
Canada Rain
Canada Rain

Canada Rain Tax: ज्या वस्तू वापरल्या जातात किंवा विकत घेतल्या जातात त्यावर सरकारकडून टॅक्स लावला जातो. वस्तू किंवा मालमत्तेवर टॅक्स लावला जातो. याच टॅक्सचा वापर करुन अनेक निर्माण कार्य हाती घेतले जातात. टॅक्स जेव्हा वाढतो तेव्हा लोकांमध्ये नाराजी दिसून येते. कॅनडाच्या टोरंटोमध्ये तर चक्क पावसाच्या पाण्यावर टॅक्स लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याची माहिती सरकारच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन

कॅनडामध्ये स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा नाले-रस्ते पावसाच्या पाण्याने तुंडूब भरतात. लोकांना कामासाठी देखील घराच्या बाहेर निघता येत नाही. मागच्या पावसावेळी देशाची राजधानी ओटावामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. (Now there will be a tax on rain water canada started preparing What is issue)

Canada Rain
Video: अशोका युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांकडून जातीवादी घोषणा? सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया

लोकांची अडचण दूर करण्यासाठी स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन कॅनडामध्ये महत्त्वाचं ठरतं. पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं यात अभिप्रेत असतं. अधिक पाऊस झाल्यास जमीन किंवा झाडं सर्व पाणी शोषून घेऊ शकत नाहीत. पाणी तसंच वाहून जातं. अशा पाण्यामुळे रहदारीच्या भागात अडचण निर्माण होते.

Canada Rain
Viral video: वा रे पठ्ठ्यांनो! दारु पिऊन शाळेत आलेल्या शिक्षकाला घडवली अद्दल; व्हिडिओ पाहाच

रनऑफ वॉटर काय आहे?

रस्ते, फूटपाथ, पार्किंगची जागा, इमारती, काँक्रिटिकरण केलेल्या जागा यामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होतं. कॅनडामध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे, कारण याठिकाणी मोठ्या प्रमात बर्फवृष्टी देखील होत असते. या बर्फामुळे देखील 'रनऑफ' निर्माण होतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाणी पडणे याला रनऑफ वॉटर म्हटलं जातं.

रनऑफ वॉटरमुळे टोरंटोमध्ये पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळेच टोरंटो प्रशासनाने रनऑफ वॉटरवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टॉर्मवॉटर चार्ज अँड वॉटर सर्विस चार्ज कंसल्टेशनचा विचार सुरु केला आहे. यानुसार, ज्या जागांमुळे पाणी झिरपण्याची क्षमता कमी होते अशा ठिकाणांवर टॅक्स लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यानुसार, इमारती, कार्यालये, हॉटेल अशा स्थानांवर टॅक्स लावला जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी जास्त रहदारी असेल त्याठिकाणाला जास्त टॅक्स द्यावा लागेल.

Canada Rain
ब्रिटनमध्ये केला करोडोंचा घोटाळा; आता भारतात मांडून बसलाय ठाण; वाचा काय आहे कॅनडा कनेक्शन?

लोकांमध्ये संताप कशामुळे?

कॅनडामध्ये आधीच लोकांवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लादण्यात आला आहे. त्यात या नव्या टॅक्सच्या चर्चेमुळे लोकांमध्ये असंतोष आहे. शिवाय या टॅक्सबाबत काहीही स्पष्टता नाही. जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत, जे बेघर आहेत त्यांचे काय होईल याबाबत माहिती नाही. या नव्या प्रकारच्या टॅक्समुळेच लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com