

Nvidia CEO Jensen Huang
esakal
Jensen Huang Apology : जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनसन हुआंग यांनी आपल्या खासगी आयुष्यासह कंपनीतील कामकाजाबाबतही अनेक धक्कादायक खुलासे केले. आपल्याकडून चुका झाल्याची कबुली देत त्यांनी पत्नी लोरी आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांची माफी मागितली. आपल्या वागण्यामुळे कुटुंबीयांसह कर्मचाऱ्यांनाही त्रास झाल्याचे त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे, स्वतःमधील चुका समजून घेण्यासाठी आपण दररोज सुमारे दीड तास समुपदेशन घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.