Ship Hijacked Near Hormuz Strait
esakal
संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पूर्व किनारपट्टीवर नांगरून उभे असलेले एक जहाज काही अज्ञात व्यक्तींनी ताब्यात घेत ते इराणकडे नेले जात असल्याची माहिती ब्रिटनच्या 'युनायटेड किंग्डम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने दिली. फुजेराह बंदरापासून ७० किलोमीटरवर असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळून काही अज्ञात व्यक्तींनी या जहाजाचा ताबा घेतला. या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.