34 हजार जणांचा घेतला राजीनामा, कारण वाचून व्हाल थक्क... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

34 हजार जणांचा घेतला राजीनामा, कारण वाचून व्हाल थक्क...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

ब्रिटनमधील 30 हजारहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून ते बेरोजगार होतील. वास्तविक, हे आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांना अद्याप कोरोना वॅक्सीन मिळालेली नाही. याशिवाय त्या केअर होम कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यास थांबविण्यात आला आहे. ज्यांनी फक्त एकच डोस घेतला आहे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

हेही वाचा: New zealand | पंतप्रधानांच्या चालू FB live मध्ये लेकीची धमाल!

सरकारने केला असा युक्तिवाद

'द सन' च्या अहवालानुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)च्या आकडेवारीनुसार एकूण 34, 000 फ्रंट लाइन कामगारांना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय कारण सांगून लस घेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सांगितले की, रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

हेही वाचा: ऐकावं ते नवल...23 कोटींसाठी गमावले पाय

मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळली

सरकारने काल आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला होता, त्यात लसीकरणाची अंतिम मुदत एप्रिलपर्यंत वाढवावी, असे म्हटले होते. त्याचवेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे हिवाळ्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासू शकते.

हेही वाचा: इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स

'सरकारने आमचा विश्वासघात केला'

बोरिस जॉन्सन सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. लस न मिळाल्याने नुकतीच नोकरी गमावलेल्या डेव्ह केली यांनी सांगितले की, सरकारने शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला आहे, ज्याने कोरोनाच्या सुरुवातीला कोणत्याही संरक्षणाशिवाय लोकांचे प्राण वाचवले. यावेळी केली म्हणाली, 'हे फ्रंट लाइन वर्कर्स होते ज्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांवर उपचार केले. मात्र सरकार एका झटक्यात सर्व काही विसरले.

loading image
go to top