

Energy crisis pushes 70 countries towards work from home
Esakal
Pakistan and Sri Lanka Among Nations Facing Energy Restrictions: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन करताना वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या असं म्हटलं आहे. याशिवाय सोनं वर्षभर खरेदी करू नका, परदेश दौरा करू नका, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्या असंही सांगितलंय. यात त्यांनी सर्वाधिक जोर दिला तो इंधनाचा वापर आवश्यक तेवढाच करा, इंधन बचत करा, सार्वजनिक वाहने वापरा असं मोदींनी म्हटलंय. इराणमद्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक थांबली आहे. जगभरात तेलाचा तुटवडा भासत आहे. पाकिस्तान, श्रीलंकेसह भारताच्या शेजारी देशांनी मार्चपासून निर्बंध लादले आहेत. तेलाची टंचाई भासू नये म्हणून पावले उचलली आहेत.