अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या | Pakistan on Abhinandan vardhman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यातं आलं. मात्र यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बालाकोट हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलातील प्रमुख पायलट आणि ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ १६ लढाऊ विमान पाडलं होतं. आता अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यातं आलं. मात्र यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने याआधीही भारतावर वेगवेगळे आरोप केले आहेत. तसंच सत्य झाकून काल्पनिक गोष्टी जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आताा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने वक्तव्य करताना म्हटलं की, भारताने अभिनंदन वर्धमान यांचा केलेला गौरव चुकीचा आहे. शौर्याचा काल्पनिक गौरव असल्याचंही पाकने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदन वर्धमानचा भारताने केलेला गौरव हा लष्कराच्या आचार संहितेविरोधात असल्याचं म्हटलं आहे. अभिनंदन वर्धमानला पाकिस्तानी सैन्याने पकडण्याआधी त्यांनी पाकिस्तानचं एफ १६ लढाऊ विमान पाडलं नव्हतं असंही त्यामध्ये म्हटलं आहे.' पाकिस्तानने यापूर्वीही त्यांचे एफ १६ लढाऊ विमान अभिनंदनने पाडलं नसल्याचं सांगितलं आहे.

पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांनी त्यांचे विमान पाडले नसल्याचा दावा करताना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या स्टेटमेंटचा दाखला दिला आहे. यामध्ये अमेरिकेच्या अधिकाकाऱ्यांनी दिलेल्या वक्तव्याचाही समावेश आहे. भारताचे हवाईदल हे पराभूत झाले होते, तसंच भारताने रचलेली कथा हास्यास्पद असून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ती विश्वासार्ह नसल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

हेही वाचा: युक्रेनच्या सीमेवर रशियन फौजा, रणगाडे, पुतिन हल्ल्याचा आदेश देणार?

अभिनंदन वर्धमान यांचे सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील तिसरं सर्वोच्च लष्करी वीर चक्राने सन्मानित केलं. नोव्हेंबरमध्ये त्यांना विंग कमांडरवरून ग्रुप कॅप्टनपदी पदोन्नती देण्यात आली होती.अभिनंदन 27 फेब्रुवारी 2019 रोजी श्रीनगरमधील 51 स्क्वॉड्रनचा भाग होता आणि पाकिस्तानी हवाई दलाने सुरू केलेला हवाई हल्ला हाणून पाडण्यासाठी त्याने उड्डाण केलं होतं. भारताने जैश-ए-द्वारा चालवल्या जाणाऱ्या खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये अभिनंदनला तत्काळ लँडिंग करावं लागलं होतं.

loading image
go to top