

Pakistan Airstrike Reported in Afghanistan’s Kunar Province
esakal
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीमेपलीकडील लष्करी कारवाईची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी पूर्व अफगाणिस्तानातील कुनार प्रांतातील नुरगल जिल्ह्यात एअर स्ट्राईक केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या पाकिस्तानी विमानांनी नुरगल जिल्ह्यातील पतंग भागाला लक्ष्य केल्याचे वृत्त आहे.