esakal | पाकिस्तानची नवीन चाल, फैझ हमीद यांची ISI प्रमुखपदावरुन बदली
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानची नवीन चाल, फैझ हमीद यांची ISI प्रमुखपदावरुन बदली

पाकिस्तानची नवीन चाल, फैझ हमीद यांची ISI प्रमुखपदावरुन बदली

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: पाकिस्तानने (pakistan) आज आश्चर्यकारकरित्या लेफ्टनंट जनरल फैझ हमीद (Faiz Hameed) यांची ISI प्रमुखपदावरुन बदली केली. त्यांची पेशावर कॉर्प्स कमांडरमध्ये (Peshawar corps commander) नियुक्ती केली आहे. फैझ हमीद यांच्या जागी लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांची नियुक्ती केली आहे. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारपेक्षा ISI आणि लष्कर जास्त शक्तीशाली आहे.

१६ जानेवारी २०१९ रोजी फैझ हमीद यांची आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. फैझ हमीद हे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांचे निकटवर्तीय समजले जातात. पाकिस्तानसमोर अनेक आव्हाने असताना, फैझ हमीद यांची ISI च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा: रेल्वेकडून बोनसची घोषणा, १२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

फैझ हमीद यांच्या बदलीमागे अफगाणिस्तानातील घडामोडी असण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवलं. तिथे सरकार निर्मितीची प्रक्रिया सुरु असताना जनरल फैझ हमीद काबूलमध्ये दाखल झाले होते.

हेही वाचा: ZP Election : भाजपची स्पेस वाढतेय, शिवसेनेची अधिक घसरण - फडणवीस

पडद्यामागे सरकार निर्मितीत त्यांनी भूमिका बजावली होते. फैझ हमीद यांच्या बदलीचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.

loading image
go to top