रेल्वेची कॉलेज व्हॅनला जोराची धडक; अपघातात एक विद्यार्थी ठार, 9 जखमी I Railway Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan

पाकिस्तानातील शेखूपुरा येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका कॉलेज व्हॅनला ट्रेनची धडक बसलीय.

रेल्वेची कॉलेज व्हॅनला जोराची धडक; अपघातात एक विद्यार्थी ठार, 9 जखमी

पाकिस्तानात (Pakistan) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन आणि ट्रेन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय, तर या अपघातात आणखी 9 जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. पाकिस्तानातील शेखूपुरा (Sheikhupura) येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका कॉलेज व्हॅनला ट्रेनची धडक बसली. त्यानंतर घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखूपुरा येथील बहरियानवाल भागातील रेल्वे गेटवर शोरकोटहून येणाऱ्या एका ट्रेननं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक दिली. रेल्वेच्या या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. ही कॉलेज व्हॅन विद्यार्थ्यांना रसाला येथून शेखूपुरा येथे घेऊन जात होती. सर्व मुलं एकाच गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, बचाव पथकं अपघातस्थळी पोहोचली आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना शेखूपुरा येथील जिल्हा मुख्यालयात हलवण्यात आलंय. अलीकडेच इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये एक भीषण अपघात झाला, ज्यात 4 लोकांचा मृत्यू तर 9 लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

31 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात कार अपघातात 4 ठार आणि 9 जण जखमी झाले. वास्तविक, पाकिस्तानच्या अटक जिल्ह्यात 20 जणांना घेऊन जाणारी प्रवासी व्हॅन अनियंत्रितपणे उलटल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवान व्हॅनचे ब्रेक निकामी झाल्याने व्हॅन उलटून हा अपघात झाला. या अपघातादरम्यान व्हॅनमधील लोक रावळपिंडी जिल्ह्याच्या दिशेने जात होते.

हेही वाचा: IND vs NZ : तिकिटांचा काळाबाजार; 900 चं तिकीट 1800 ला, तर 1200 चं तिकीट...

loading image
go to top