IND vs NZ : तिकिटांचा काळाबाजार; 900 चं तिकीट 1800 ला, तर 1200 चं तिकीट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and New Zealand T20 Match

तिकीट काढू न शकलेले क्रिकेटप्रेमी काळाबाजार करणाऱ्यांकडून दुप्पट दराने तिकीट खरेदी करत आहेत.

IND vs NZ : तिकिटांचा काळाबाजार; 900 चं तिकीट 1800 ला, तर 1200 चं तिकीट...

रांची : झारखंडची (Jharkhand) राजधानी असलेल्या रांचीत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium Complex) 19 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand T20 Match) यांच्यात T20 सामना खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिकिटांची विक्रीही सुरू झालीय. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Jharkhand State Cricket Association Stadium) तिकिटांची विक्री सुरु असून यासाठी 3 काउंटर करण्यात आले आहेत. तिकीट खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळत असून रात्रीत काउंटरवर लांबलचक रांगा लागल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत काळ्या बाजाराचीही चांदी झालीय.

दरम्यान, काउंटरवरून तिकीट काढू न शकलेले क्रिकेटप्रेमी काळाबाजार करणाऱ्यांकडून दुप्पट दराने तिकीट खरेदी करत आहेत. अशा समाजकंटकांवर प्रशासनाकडून प्रभावीपणे नियंत्रण ठेवलं जात नाहीय. या तिकिटांचा काळाबाजार करणारे लोक रात्रीपासूनच काउंटरवर रांगा लावतात, त्यामुळं पहाटेपासूनच तिकीट खरेदीदारांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झालीय. तिकीट खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी जेएससीएला पोहोचत आहेत. तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्याने या क्रिकेटप्रेमींना निराशेला सामोरं जावं लागलंय.

हेही वाचा: विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटींची घड्याळं जप्त

प्रशासनाच्या नाकाखाली क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार होत असला, तरी ते प्रभावीपणे रोखलं जात नाहीय. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांची निराशा झालीय. देशातील क्रिकेटची क्रेझ सर्वांनाच परिचित आहे. रांचीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये याचं दृश्य पाहायला मिळतं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. यासाठी तिकिटांची विक्री सुरू झालीय. तिकीट खरेदी करण्यासाठी लोक दूर-दूरहून रांचीला पोहोचत आहेत. शेजारच्या बिहार राज्यातूनही मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी तिकिटांसाठी रांचीला पोहोचत आहेत. काल रात्रीपासून जेएससीएमध्ये तिकीट खरेदीसाठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: हार्दिक पांड्या म्हणतो, 'घड्याळांची किंमत ५ कोटी नव्हे तर...'

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीच्या JSCA स्टेडियमवर होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता स्टेडियमची एकूण क्षमता म्हणजेच, 100 टक्के प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. यासाठी जेएससीए आणि राज्य सरकारमध्ये करार झालाय. आता यासंदर्भात सरकारकडून केवळ एक पत्र येणं बाकी आहे. यापूर्वी राज्य सरकारनं स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा निम्म्या प्रेक्षकांनाच सामना पाहण्याची परवानगी दिली होती.

हेही वाचा: भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा

loading image
go to top